Jagjit Singh : मनोरंजन विश्वामध्ये (Entertainment News) आदरानं घ्यावं लागणारं नाव म्हणजे प्रख्यात गायक जगजित सिंग (Jagjit Singh). आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीनं या गायकानं चाहत्यांना आपलेसं केलं. त्यांच्या हदयावर अधिराज्यही केले. आज त्यांचा जन्मदिन. त्यनिमित्तानं आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. जगजित सिंग यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं. आयुष्याच्या अखेरपर्यत त्यांचा हा संघर्षमय प्रवास काही केल्या थांबला नाही. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींचा सहवास त्यांना लाभला. मात्र कष्ट काही केल्या चुकले नाही. केवळ भारतातच नाहीतर जगभरात त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. Happy Birthday News
08 फेब्रुवारी 1941 मध्ये जगजीत सिंग यांचा जन्म झाला होता. खर्जातला आवाज, आणि प्रभावी सादरीकरण यामुळे त्यांच्या गायकीचे छाप ही शेवटपर्यत श्रोत्यांच्या मनावर होती. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात श्रोत्यांची दाद मिळाली. गझल हा त्यांच्या आवडीचा प्रांत. त्यामध्ये त्यांनी मनसोक्त मुशाफिरी केली. आणि श्रोत्यांना अनवट स्वरानंद दिला. देशभर लोकप्रियता मिळवलेल्या जगजीत सिंग यांची एक वेळ अशी होती की, त्यांना बी ग्रेड दर्जाच्या गायकाचा दर्जा देण्यात आला होता. ते त्यावेळी वेगवेगळ्या लग्नांमध्ये, कुणाच्या बर्थ डे पार्टीमध्ये गाणी गाऊन पोट भरत होते.
गायक म्हणूनच आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या जगजीत सिंग यांना एका गुजराती नाटकामध्ये काम करण्याची संधीही मिळाली होती. त्यामध्ये त्यांना मुख्य रोल करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी ही ऑफर नाकारली होती. गुजराती भजन गायले होते. त्याला त्यावेळी श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी हे त्यांचे आदर्श होते. त्यांना प्रेरणास्थानी मानून त्यांनी आपली वाटचाल सुरु केली होती. जगजीत सिंग यांनी गायिका चित्रा सिंग यांच्याशी विवाह केला. त्यावेळी केवळ 30 रुपयांमध्ये त्यांचा विवाह झाला होता. जगजीत सिंग यांच्या वडिलांनी त्यांना इंजिनिअरींग करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यात जगजीत सिंग यांना काही रस नव्हता, कालांतरानं त्यांना युपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी वडिलांनी आग्रह केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.