Swapnil Joshi: जय हिंद..! मुलांच्या अंगात देशप्रेम रुजवण्यासाठी स्वप्नीलच्या बायकोचा अनोखा उपक्रम..

स्वप्नील जोशी कायमच त्याची मुलं आणि कुटुंबासोबतचे अपडेट्स शेयर करत असतो
Swapnil Joshi, Swapnil Joshi news, Swapnil Joshi family, Swapnil Joshi wife, Swapnil Joshi girlfriend, Swapnil Joshi movies, Swapnil Joshi serials, Swapnil Joshi songs, mumbai pune mumbai
Swapnil Joshi, Swapnil Joshi news, Swapnil Joshi family, Swapnil Joshi wife, Swapnil Joshi girlfriend, Swapnil Joshi movies, Swapnil Joshi serials, Swapnil Joshi songs, mumbai pune mumbaiSAKAL
Updated on

Swwapnil Joshi News: स्वप्नील जोशी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. स्वप्नीलचे चाहते त्याच्या सिनेमांची, मालिकांची, वेबसिरीजची आतुरतेने वाट पाहत असतात.

स्वप्नील सुद्धा लहानपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्याचे भारतात नव्हे तर जगभरात असंख्य फॅन फॉलोइंग आहेत.

स्वप्नील जोशी कायमच त्याची मुलं आणि कुटुंबासोबतचे अपडेट्स शेयर करत असतो. स्वप्नीलने सोशल मीडियावर नुकतीच एक गोष्ट शेअर केलीय ज्यामुळे त्याचं कौतुक होतंय.

(Jai Hind..! Swapnil joshi wife's unique initiative to inculcate patriotism in children)

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

स्वप्नीलची बायको लीना काल रविवारी त्यांच्या मुलांना डिफेन्स ट्रेनिंग साठी घेऊन गेली. स्वप्नीलची बायको लीना तिच्या मुलांना घेऊन बोरिवलीला गेली होती.

संरक्षण दला संबंधी खास प्रशिक्षण लीनाने त्यांच्या मुलांना दिलं. स्वप्नीलने याविषयी सोशल मीडियावर मुलगा आणि बायकोचे फोटो पोस्ट करून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारी पोस्ट लिहिली आहे.

Swapnil Joshi, Swapnil Joshi news, Swapnil Joshi family, Swapnil Joshi wife, Swapnil Joshi girlfriend, Swapnil Joshi movies, Swapnil Joshi serials, Swapnil Joshi songs, mumbai pune mumbai
Sachin Tendulkar Birthday: सचिन तेंडुलकर लता मंगेशकरांना 'या' नावाने हाक मारायचा
Swapnil Joshi, Swapnil Joshi news, Swapnil Joshi family, Swapnil Joshi wife, Swapnil Joshi girlfriend, Swapnil Joshi movies, Swapnil Joshi serials, Swapnil Joshi songs, mumbai pune mumbai
असं सौंदर्य पाहिल्यावर सकाळ खरंच 'शुभ' जाईल.. Bhagyashree Limaye

स्वप्नील लिहितो.... ही मुलं नुकतीच बोरिवली येथील संरक्षण प्रदर्शनातून परतली. लीना रविवारी दुपारी ही खास गोष्ट केल्याबद्दल धन्यवाद. ही लहान मुलं लहानपणापासून प्रत्येक गोष्टीला जय हिंद म्हणत आहेत.. अजुन काय पाहीजे !

त्यांच्यामध्ये देशप्रेम रुजवण्याचे आणि त्यांना आपल्या सशस्त्र दलांच्या बलिदानाची आणि भारतावरील प्रेमाची ओळख करून देण्याचे हे योग्य वय आहे!

वास्तविक जीवनातील खऱ्या हिरोंना पाहण्यासाठी ते सैन्याच्या टँकमध्ये बसण्यापर्यंत, ते जादू करतात...आणि मला अभिमान आहे !!!! जय हिंद!

स्वप्नीलने ही पोस्ट शेयर केल्यानंतर त्याच्या मुलांचं आणि बायकोचं कौतुक होतंय. स्वप्नीलची मुलं मायरा आणि राघव चर्चेत असतात.

स्वप्नील अनेकदा मुलांसोबतचे व्हिडिओ आणि फोटो शेयर करत असतो. स्वप्नील - लीना हे नवरा बायको आणि स्वप्नीलचे आई - बाबा मायरा - राघववर संस्कार करत असतात.

स्वप्नील आणि त्याच्या बायकोने लहानपणापासून मुलांना देशप्रेमाचे धडे देणं ही खूप खास गोष्ट आहे. स्वप्नीलची नुकतीच संपलेली तू तेव्हा तशी मालिका चांगलीच गाजली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.