Jailer Movie : रजनीकांत आला अन् सनीचा मूड खराब करुन गेला! 'जेलर'चं वादळ घोंघावणार, अक्षय कुठचं दिसेना

यासगळ्यात अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि गदर २ मध्ये जोरदार फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे.
Rajinikanth jailer advance booking equals sunny deol gadar 2
Rajinikanth jailer advance booking equals sunny deol gadar 2esakal

Rajinikanth jailer advance booking equals sunny deol gadar 2 : ऑगस्टचा महिना हा मनोरंजन विश्वासाठी भलताच लक्षवेधी ठरणार आहे. या महिन्यात चारपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणार असून ते बिग बजेट आहेत. त्यात मोठमोठ्या सेलिब्रेटींच्या भूमिका आहेत. त्यात सनी देओलचा गदर २, अक्षय कुमारचा ओह माय गॉड २ आणि रजनीकांत यांच्या जेलरकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

यासगळ्यात अक्षय कुमारचा ओएमजी २ आणि गदर २ मध्ये जोरदार फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण हे दोन्ही चित्रपट अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. आतापर्यत गदर २ आणि ओएमजी २ चे ट्रेलर, त्यातील गाणी प्रदर्शित झाली असून त्यामध्ये सनीचा गदर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. त्याची चर्चाही सर्वाधिक आहे. बॉक्स ऑफिसवर गदर २ वरचढ ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दुसरीकडे रजनीकांत यांच्या जेलरची मोठी हवा आहे. तो देखील याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. रजनीकांत यांचा चित्रपट केवळ भारतातच नाहीतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. गदर २ ची तर प्रदर्शनापूर्वीच ५० हजारांपेक्षा जास्त तिकीटांची बुकींग झाली आहे. तर ओएमजीची सुरुवात त्या तुलनेनं फारच कमी आहे. यात आता जेलरच्या अॅडव्हान्स तिकींटांच्या बुकींग बाबत एक अपडेट समोर आली आहे.

रजनीकांत यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणं हे म्हणजे एखाद्या उत्सवासारखे असते. त्याचे होणारे सेलिब्रेशन याचीही चर्चा होते. त्यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक, हारतूरे, थिएटर बाहेर रजनीकांत यांचे मोठे कटआऊट्स हे सारं चाहत्यांच्या परिचयाचे आहे. त्यामुळे याही वेळेस हा जल्लोष कायम राहणार यात शंका नाही. मात्र त्यांचा हा चित्रपट सनी आणि अक्षयसाठी डोकेदुखी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Rajinikanth jailer advance booking equals sunny deol gadar 2
Gadar 2 : 'तुम्हाला हल्क, सुपरमॅन चालतो मग तारासिंगच्या नावानं पोटात का दुखतं? गदरच्या सनीचा प्रश्न

थलायवा यांचा जेलर हा दहा ऑगस्ट रोजीच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी सनी आणि अक्षयचे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कुणाची सरशी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलर पाहण्यासाठी काही खासगी कार्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. साऊथमध्ये रजनीकांत यांचे चित्रपट प्रदर्शित होणे हे एखादा सण साजरा करण्यासारखे असते, याचा प्रत्यय यापूर्वी आला आहे.

अॅडव्हान्स बुकींगविषयी बोलायचे झाल्यास, गदरनं प्रदर्शनापूर्वीच एक लाखांहून अधिक तिकिटांची कमाई केली आहे. गेल्या रविवारपासून ही बूकींग सुरु झाली आहे. मात्र जेव्हा रजनीकांत यांच्या जेलरची गोष्ट येते तेव्हा तर गदर २ बराच मागे पडल्याचे दिसून येते. सेकनिल्कच्या च्या माहितीनुसार, गदर २ ची आतापर्यत पावणे दोन लाख तिकीटं बूक झाली आहेत. तर जेलरची २ लाख ३० हजार अॅडव्हान्स तिकीटं बूक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

किंग खानचा पठाण ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हा अशा प्रकारचा प्रतिसाद अॅडव्हान्स तिकिट बूकींगला मिळाला होता. तसाच तो आता रजनीकांत यांच्या जेलरला मिळताना दिसतो आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात रजनी यांचा जेलर सनीच्या गदर २ साठी डोकेदुखी ठरणार अशी चर्चाही सुरु झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com