G Marimuthu passes away: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

कप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे आज (८ सप्टेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Actor, director G Marimuthu passes away
Actor, director G Marimuthu passes away Esakal
Updated on

Actor, director G Marimuthu passes away: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक जी मारीमुथू यांचे आज (८ सप्टेंबर) निधन झाले. त्यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

जी मारीमुथू यांना सकाळी 8:30 वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. ते सन टीव्ही सोप, एथिर नीचलसाठी डबिंग करत असतांना अचानक खाली कोसळल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Actor, director G Marimuthu passes away
Kangana-Nausheen: मला कंगनाच्या कानाखाली मारायचीय! पाकिस्तानी अभिनेत्री इतकी का भडकली?

मारिमुथू यांनी 1999 मध्ये अजितच्या 'वाली' चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी असई (1999) या चित्रपटात दिग्दर्शक वसंत यांना असिस्ट केले, ज्यात अजित, सुवललक्ष्मी आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते.

त्याचबरोबर त्यांनी कन्नम कन्नम (2008) या चित्रपटातुन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच पण कथा, पटकथा आणि संवादलेखनही केले आणि चित्रपटात एक छोटी भूमिका साकारली होती.

Actor, director G Marimuthu passes away
Subhedar: 'जवान' पाहायला जा पण 'सुभेदार' कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, यशस्वी तिसरा आठवडा

अनेक तामिळ चित्रपटात ते सहाय्यक अभिनेत्याच्या भुमिकेत दिसले. ज्यात युद्धम सेई (2011), कोडी (2016), बैरवा (2017), काडैकुट्टी सिंगम (2018), शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम (2021), आणि अतरंगी रे (2021) या हिंदी चित्रपट यांचा समावेश आहे.

Actor, director G Marimuthu passes away
Jawan 2: शाहरुखचा जवान 2 येणार? थेट संजू बाबाने दिली 'या' सीन मधुन तगडी हिंट

त्यांनी 2014 मध्ये 'पुलिवाल' चित्रपट दिग्दर्शित केला होता ज्यात प्रसन्ना आणि वेमल यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा एक थ्रिलर चित्रपट होता.

मारिमुथू यांचा या आठवड्यात रेड सँडल वुड चित्रपट रिलिज झाला होता , ज्यामध्ये त्यांनी कबाली-फेम विश्वंथच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्यांनी इंडियन 2 मध्येही भूमिका साकारली आहे, जो त्यांचा शेवटचा चित्रपट असेल.

मारिमुथू यांच्यावर मदुराई येथे अंतिम संस्कार होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.