Vinayakan Arrested: जेलर फेम अभिनेत्याला अटक! दारुच्या नशेत पोलिस ठाण्यातच केला राडा

 Jailor Actor Vinayakan Arrested:
Jailor Actor Vinayakan Arrested:Esakal
Updated on

Jailor Actor Vinayakan Arrested: साउथ सुपस्टार रजनीकांतचा जेलर सिनेमा सुपर डुपरहिट झाला. थैलवा रजनीकांतची जादू भारतात नव्हे तर जगभरात पसरली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवून दिला.

मात्र आज जेलर सिनेमातील रजनीकांत नव्हे या चित्रपटात खलनायकाची भुमिका साकारणारा अभिनेता विनायकन चर्चेत आला आहे. त्याने जेलर चित्रपटात वर्मनची भुमिका साकारली होती. आता अभिनेता विनायकन अडचणीत सापडला आहे.

केरळ पोलिसांनी मंगळवारी विनायकनला अटक केली आहे. त्याच्यावर दारूच्या नशेत पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी त्याच्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादानंतर त्याला एर्नाकुलम टाउन नॉर्थ पोलीसांनी अटक केली होती.

त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं मात्र विनायकन इथेही शांत बसला नाही त्याने याठिकाणीही एकच गोंधळ घातला. त्यामुळे पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

विनायकन सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्टेशनवर पोहोचला आणि त्याने पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. पोलिसांनी त्याला काही काळ सहन केले मात्र तरीही त्याचे अपमानास्पद वर्तन सुरूच राहिल्याने पोलिसांना त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस ठाण्यातील एक महिला पोलीस अधिकारी आणि पाच पोलीस दुपारी 3.30 वाजे सुमारास विनायकनच्या घरी गेले होते. यावेळी जेव्हा पोलिसांनी विनायनककडे ओळखीचा पुरावा मागितला त्यावेळी तो भडकला आणि त्याने पोलिसांसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याने त्याने तिथेही चांगलाच राडा केला म्हणुन विनायकनला अटक करण्यात आली.

 Jailor Actor Vinayakan Arrested:
Shraddha Kapoor: दसऱ्याला श्रद्धानं दिलं स्वत:लाच गिफ्ट! घरी आणली 'लॅम्बोर्गिनी'! किंमत ऐकून बसेल धक्का...

मात्र, विनायकनची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी त्याच्यावर गोंधळ घालणे आणि पोलिसांवर अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विनायकनवर केरळ पोलिस कायद्याच्या जामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री 10.30 वाजता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.