Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection
Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection esakal

Gadar 2 Vs Jailer : गदरला चित्रपटगृहांचा 'फेव्हर', तरीही हटला नाही 'जेलर'! रजनीनं सनीला दिली जोरदार टक्कर

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रजनीच्या जेलर चित्रपटाला देशातील काही राज्यांमध्ये थिएटर मिळाले नसल्याचे दिसून आले आहे.
Published on

Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection : बॉलीवूडमध्ये सध्या गदर २ नं धुमाकूळ घातला आहे. २२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. सनीच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. दुसरीकडे रजनीकांत यांच्या जेलरचीही हवा आहे. Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रजनीच्या जेलर चित्रपटाला देशातील काही राज्यांमध्ये थिएटर मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रामध्ये देखील जेलरच्या तुलनेत गदरला अधिक फेव्हर मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावर तर गदर २ विषयी वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गदर २ ने मोठमोठे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कित्येक राजकीय, सामाजिक संस्थांनी गदर २ पाहण्याचे आवाहन केले आहे. काही राजकीय नेत्यांनी देखील त्यावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. देशाच्या राष्ट्रपतींनी देखील गदर २ पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी राष्ट्रपतींसाठी खास स्क्रिनिंग आयोजित करणार असल्याचे सांगितले होते.

गेल्या आठवड्यात बॉलीवूडमध्ये अक्षय कुमारचा ओएमजी २, गदर २, रजनीकांत यांचा जेलर प्रदर्शित झाला आहे. साऊथचा सुपरस्टार अशी ओळख असलेल्या रजनींकांतच्या चित्रपटानं देखील गदर २ ला जोरदार फाईट दिली आहे. दोन्ही चित्रपटांनी आतापर्यत दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये रजनीचा जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा तो एखादा सण असल्यासारखा साजरा केला जातो.

Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

रजनीच्या नावाला असणारे वलय पाहून चाहत्यांनी रजनीला पुन्हा एकदा पसंती दिली आहे. सनीचा विषय हा गदर पुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याला देशभक्तीचे स्वरुप आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं तर या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. यादिवशी गदरनं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले आहे.

Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection
Jailer Review: बाप 'बाप' असतो, त्याचा नाद करायचा नाय! रजनीचा 'जेलर' एकदम 'किलर'

गदरची कमाईनं केला विक्रम....

गदरचा पहिला दिवस मोठा होता. त्यादिवशी ४०.१० कोटी कमावले. दुसऱ्या दिवशीची कमाई ४३.०८ कोटी एवढी होती. तिसऱ्या दिवशी ५१.७० कोटींची कमाई केली. चौथ्या आणि पाचव्या दिवशी ही आकडेवारी अनुक्रमे ३८.७० तर ५५.५० कोटींची कमाई करुन आपलं वेगळंपण दाखवून दिले आहे. गदर २ ने आतापर्यत एकुण २२९.०८ कोटींची कमाई केली आहे. गदर ही यावर्षी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म झाली आहे.

जेलरनं किती कमाई केली माहितीये?

रजनीच्या जेलरनं पहिल्याच दिवशी ४८.३५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३४. ४० कोटी कमावले. चौथ्या दिवशी त्यात आणखी वाढ झाली. तो आकडा ४२.२० कोटी एवढा होता. तर पाचव्या दिवसाची कमाई २३.५५ कोटी एवढी होती. सॅनिकच्या अर्ली मीडियानं दिलेल्या माहितीनुसार सहाव्या दिवशी जेलरनं ३३ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. जेलरनं एकुण २०७. १५ कोटींची कमाई केली आहे.

Gadar 2 Vs Jailer 2 Box Office Collection
Gadar 3 : 'गदर 3 पण येणार?' दिग्दर्शकानं जे सांगितलं ते ऐकून, तुम्हीही म्हणाल....!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.