Rajinikanth Jailer Movie : जेलरचा धिंगाणा! तर रजनीकांत झारखंडमधील राजरप्पा मंदिरात भक्तीत तल्लीन

जेलर यशस्वी झाल्यावर रजनीकांत सध्या विविध मंदिरांना भेट देत असुन त्यांचा भक्तीमय अंदाज पहायला मिळतोय
jailer Rajinikanth visits Rajrappa temple and meets Jharkhand Governor after ‘Jailer’ success
jailer Rajinikanth visits Rajrappa temple and meets Jharkhand Governor after ‘Jailer’ successSAKAL
Updated on

Jailer Rajinikanth News: सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा प्रेक्षकांना आवडला असुन सिनेमाने बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली.

रजनीकांत यांचे याआधीचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर तितके यशस्वी झाले नाहीत. पण जेलरने मात्र बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केली. जेलर यशस्वी झाल्यावर रजनीकांत सध्या विविध मंदिरांना भेट देत आहेत. अशातच रजनीकांत यांनी झारखंडमधील राजरप्पा मंदिराला भेट दिली.

(jailer Rajinikanth visits Rajrappa temple and meets Jharkhand Governor)

jailer Rajinikanth visits Rajrappa temple and meets Jharkhand Governor after ‘Jailer’ success
Chhaya Kadam: 'सैराट' फेम छाया कदम यांना मातृशोक, सोशल मिडीयावर भावुक पोस्ट करत आईला श्रद्धांजली

सुपरस्टार रजनीकांत हे सध्या झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी रांची येथील योगदा आश्रमात तासभर ध्यान केले आणि राजरप्पा मंदिरालाही भेट दिली. याशिवाय एक दिवस आधी रजनीकांत यांनी झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेतली होती.

रजनीकांत भक्तीत तल्लीन, राज्यपालांची घेतली भेट

रजनीकांत हे परमहंस योगानंद यांचे शिष्य आहेत. रांची येथे मुख्यालय असलेल्या त्यांच्या गुरूंच्या आश्रम योगदा सत्संग सोसायटीमध्ये त्यांनी ध्यान केले. ध्यान केल्यानंतर रजनीकांत थेट राजरप्पा मंदिराकडे रवाना झाले. तिथे त्यांनी प्रार्थना केली आणि सांगितले की, राजरप्पा मंदिरातील चिन्नमस्ता देवीबद्दल ते अनेक दिवस ऐकुन होते.

अनेक दिवसांपासुन त्यांना दर्शन घ्यायची ईच्छा होती. त्यामुळे ते अखेर राजरप्पा मंदिरात पोहोचले. राजरप्पा मंदिरात गेल्यावर रजनीकांत भक्तीत तल्लीन होताना दिसले.

राजरप्पा मंदिरातुन आल्यावर रजनीकांत यांनी झारखंडचे राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीविषयी राज्यपाल लिहीतात, "देशातील सर्वात मोठ्या आणि महान सुपरस्टारपैकी एक रजनीकांत यांना भेटून मला खूप आनंद झाला. तो रांचीमध्ये आल्याने खूप बरे वाटत आहे. झारखंडच्या भूमीवर मी रजनीकांतचे मनापासून स्वागत करतो."

रजनीकांतच्या जेलरनं किती कमाई केली माहितीये?

रजनीच्या जेलरनं पहिल्याच दिवशी ४८.३५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३४. ४० कोटी कमावले. चौथ्या दिवशी त्यात आणखी वाढ झाली. तो आकडा ४२.२० कोटी एवढा होता. तर पाचव्या दिवसाची कमाई २३.५५ कोटी एवढी होती. सॅनिकच्या अर्ली मीडियानं दिलेल्या माहितीनुसार सहाव्या दिवशी जेलरनं ३३ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. जेलरनं एकुण २०७. १५ कोटींची कमाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.