Gautami Patil : गौतमी पाटीलने ‘पाटील’ आडनाव लावावं का नाही? मराठा महासंघात दुमत

पाटील आडनावावर कुणीही मक्तेदारी सांगू नये गौतमी पाटीलला आडनाव वापरण्यापासून कोणीही रोखू नये, असं मराठा महासंघाचे मत
Gautami Patil
Gautami Patilsakal
Updated on

महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलचं नाव सातत्याने चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होते. त्यामुळे तिच्यावर टीका केली जाते. आता तिने 'पाटील' आडनाव लावू नये, असा इशारा तिला देण्यात आला आहे. शिवाय त्यासंबंधीची एक बैठक पुण्यात झाली होती. गौतमीचं खरं आडनाव 'पाटील' नसून 'चाबुकस्वार' असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे पाटील हे आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय, असा तिच्यावर आरोप आहे.

तिने पाटील आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयक राजेंद्र जराड पाटील यांनी दिला. एकीकडे पुण्यात मराठा महासंघाने गौतमीला पाटील आडनाव लावण्यास विरोध केला. तर दुसरीकडे मात्र जळगावतील मराठा महासंघाने गौतमी पाटीलला पाठिंबा दिला आहे.

Gautami Patil
Gautami Patil : पाटील आडनाव लावणार की नाही? गौतमीनं एका झटक्यात विषय संपवला; म्हणाली...

पाटील हे आडनाव कुणाची मक्तेदारी नाही. पाटील हे आडनाव कोणतीही जात दर्शवत नाही. हे आडनाव म्हणजे एक उपाधी आहे. ज्यांच्याकडे पाटीलकी असायची ते पाटील आडनाव लावायचे. अगदी ब्राह्मणांमध्येही पाटील आडनाव आहे. त्यामुळे पाटील आडनावावर कुणाची मक्तेदारी नाही. गौतमी पाटीलला आडनाव वापरण्यापासून कोणीही रोखू नये, असं मराठा महासंघाने म्हटलं आहे.

Gautami Patil
Ajit Pawar News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणारच! अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

मराठा सेवा संघाचे नेते सुरेंद्र पाटील यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलचं आडनाव पाटील आहे, म्हणून मराठा समाजाची बदनामी होत आहे असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. वैयक्तिकरित्या ते मला पटत नाही. सामाजिकरित्या पाटील हे आडनाव हे मराठा समाजाचं आहे, असं मला वाटत नाही. कारण मी स्वत: पाटील आहे. पण आमचं मूळ आडनाव जाधव आहे. पण आमच्या घरात पाटीलकी असल्याने आमच्या घरच्यांनी पाटील आडनाव लावलं आहे, असं सुरेंद्र पाटील म्हणाले आहेत.

Gautami Patil
PM Modi : नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदे बरसले; म्हणे, नावडतीचं…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.