Ajit Bhagat Passed Way: 'जांभूळ आख्यान' फेम जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचं निधन

अजित भगत हे प्रयोगशील व्यक्तीमत्व अकाली जाणे हे रंगभूमीचे भरून न येणारे नुकसान आहे
ajit bhagat, ajit bhagat passes away
ajit bhagat, ajit bhagat passes awaySAKAL
Updated on

Ajit Bhagat Passed Way: जेष्ठ रंगकर्मी, अभिनेता, दिग्दर्शक अजित भगत सरांचे आज पहाटे 3 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनाच्या वेळी ते त्यांच्या घरीच होते.

('Jambhul Akhyan' fame veteran actor, director Ajit Bhagat passes away)

ajit bhagat, ajit bhagat passes away
Parveen Babi Birthday: महेश भटच्या प्रेमात आकंठ बुडालेली परवीन.. पण या कारणाने होऊ शकलं नाही लग्न

अजित भगत म्हणजे ऍब्सर्ड आणि ऍब्स्ट्रॅक्ट शैलीचा लिलया वापर करीत नाटक 'जगणारे रंगधर्मी'. चालते बोलते 'नाट्यविद्यापीठ'. प्रायोगिक नाटकाचे हे 'शेवटचे भीष्माचार्य' आपल्यातून आज गेले आहेत.

ajit bhagat, ajit bhagat passes away
Milind Gawali: आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गाईंची... मिलिंद गवळी यांच्या नवीन पोस्टची चर्चा

'आर्य चाणक्य', 'जांभूळ आख्यान', 'सगेसोयरे', 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचं मूल', 'मुंबईचे कावळे', 'जय जय रघुवीर समर्थ', 'झाला अनंत हनुमान', 'अरण्य-किरण' अशी प्रायोगिक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली अनेक नाटके अजित सरांनी दिग्दर्शित केली.

दिग्दर्शनासोबतच अभिनय क्षेत्रही त्यांनी गाजवले. 'मॅड मॅड मर्डर', 'एक वाडा झपाटलेला' इत्यादी मालिका तसेच विशेष उल्लेखनीय म्हणजे पंडित सत्यदेव दुबेजीच्या 'इसापचा गॉगल' या नाटकातील अजित सरांचा अभिनय खूप वाखाणला गेला.

'कंपनी' , 'मुंबई मेरी जान' अशा हिंदी चित्रपटांमधेही सरांनी अभिनय केला आहे. अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित अजित भगत हे प्रयोगशील व्यक्तीमत्व अकाली जाणे हे रंगभूमीचे भरून न येणारे नुकसान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()