Titanic Tourist Submarine: 'टायटॅनिक अन् टायटन पाणबुडीच्या अपघातात साम्य', जेम्स कॅमेरॉनची प्रतिक्रिया चर्चेत..

Titanic Tourist Submarine 
 James Cameron on Titan submarine loss
Titanic Tourist Submarine James Cameron on Titan submarine loss Esakal
Updated on

James Cameron on Titan submarine loss: गेल्या काही दिवसांपासून टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा शोध सुरु होता. मात्र या बेपत्ता पाणबुडीबाबत आज अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे.

तपास करत असलेल्या नौदलाला या बेपत्ता टायटन पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. टायटॅनिक जहाजाजवळच अमेरिकन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना या टायटन पाणबुडीचे काही अवशेष सापडले असून या पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाला या स्फोटात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

'टायटॅनिक' सारख्या जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांसह 68 हून अधिक हॉलीवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्गज चित्रपट निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनी टायटन पाणबुडीच्या स्फोटात पाच व्यक्तींच्या मृत्यू बद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Titanic Tourist Submarine 
 James Cameron on Titan submarine loss
Chaiyya Chaiyya Video: व्हाईट हाऊसमध्ये मोदींची इंट्री, छैय्या, छैय्या गाण्यानं जंगी स्वागत

एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, कॅमेरून यांनी डायव्हिंग समुदायाचे बऱ्याच काळ सदस्य म्हणून होते. त्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ते स्वत: 33 वेळा खोल समुद्रात गेल्याच चित्रपट निर्मात्याने सांगितलं.

Titanic Tourist Submarine 
 James Cameron on Titan submarine loss
Rashmika Mandana: माझ्यात अन् मॅनेजरमध्ये सगळं.. मॅनेजरने 80 लाखाला फसवल्यावर श्रीवल्लीच्या टिमच्या पत्राने भुवया उंचावल्या

1997 च्या टायटॅनिक या चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले कॅमेरॉन म्हणाले की, महासागर अभियांत्रिकी समुदायातील अनेक सदस्य पाणबुडीबद्दल चिंतित होते.

कॅमेरॉन म्हणाले की अनेक समुद्र-अन्वेषक समुदायातील लोकांनी ओशनगेट मोहिमेला पत्रे लिहिली होतीआणि चेतावणी दिली होती की त्यांची पाणबुडी खूप प्रायोगिक आहे. 

त्याच वेळी, खोल समुद्रात शोध घेणाऱ्या अभियांत्रिकी समुदायातील उच्च लोकांनीही कंपनीला पत्र लिहून ही पाणबुडी प्रवाशांना वाहून नेण्यास योग्य नसल्याचा इशारा दिला होता. ते प्रमाणित करून घेण्याची गरज होती.

हॉलीवूड चित्रपट निर्मात्याने सांगितले पुढे सांगितले की टायटॅनिक आपत्ती सारखीच घटना घडल्याने त्यांना धक्का बसला होता. ते म्हणाले की, "टायटॅनिक आपत्ती आणि ही घटना यांच्यातील साम्य पाहून मला धक्का बसला. कॅप्टनला वारंवार चेतावणी देण्यात आली होती. त्याच्या जहाजाच्या पुढे असलेल्या बर्फाविषयी वारंवार त्याला सांगण्यात आले होते, तरीही तो अंधारात बर्फावरुन पूर्ण वेगाने पुढे जात होता. आणि परिणामी अनेक लोक मरण पावले

Titanic Tourist Submarine 
 James Cameron on Titan submarine loss
Mukesh Khanna : 'तुम्ही लग्न का नाही केलं'? शक्तिमाननं दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही म्हणाल...

त्यांनी सांगतिलं की, 100 वर्षांनंतर त्याच ठिकाणी अशीच घटना घडली हे "खूप विचित्र" आहे. ही घटना जेम्स कॅमेरूनसाठी अधिक त्रासदायक आहे कारण टायटन पाणबुडीवर बसलेल्या 5 जणांपैकी पॉल हेन्री नार्गिओलेट हा त्यांचा चांगला मित्र होता. 


जेम्स कॅमेरून म्हणाले की, 'पीडितांच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकत नाही. गेल्या ४ दिवसांपासून त्या लोकांना खोटी आशा दिली जात होती. घटलेल्या घटनेसाठी कोणतंही कारणे देता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.