jane dipika garrett who became the first plus-size model at Miss Universe 2023
jane dipika garrett who became the first plus-size model at Miss Universe 2023SAKAL

Miss Universe 2023: वर्षभरापूर्वी स्वतःचा जीव द्यायला निघालेली दीपिका बनली मिस युनिव्हर्स २०२३ मधली पहिली प्लस साइज मॉडेल

जेन दीपिकाने मिस युनिव्हर्स स्पर्धेत अनोखी कामगिरी केलीय
Published on

मिस युनिव्हर्सची स्पर्धा काल उत्साहात पार पडली. या स्पर्धेत निकारागुआच्या शेनिस पॅलासिओस हिला मिस युनिव्हर्स 2023 चे विजेती घोषित करण्यात आले आहे.

यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा सर्वार्थाने वेगळी ठरली. सौंदर्यवती म्हणजे झिरो फिगर, फिट अँड फाईन असा टॅग एका स्पर्धकाने मोडून काढला. तिचं नाव जेन दीपिका गेरेट.

जेन ही मिस युनिव्हर्स स्पर्धेतली पहिली प्लस साईज मॉडेल ठरली. जेनचा आजवरचा प्रवास प्रेरणादायी आहे. आत्महत्या करायला निघालेल्या जेनने आज थेट मिस युनिव्हर्सच्या मंचावर सर्वांना तिची दखल घ्यायला भाग पाडलं. जाणून घ्या तिच्याविषयी...

(jane dipika garrett Miss Universe 2023)

jane dipika garrett who became the first plus-size model at Miss Universe 2023
Ind vs Aus Final: साथ तुझी माझी.. पराभवाच्या दुःखात अनुष्का विराटच्या पाठीशी ठाम

म्हणुन दीपिका आत्महत्या करणार होती...

आज मिस युनिव्हर्स स्पर्धेतील प्लस साईज मॉडेल म्हणून दीपिका लोकप्रिय झाली असली तरीही काहीच महिन्यांपुर्वी वाढलेल्या वजनामुळे ती आत्महत्या करायला जाणार होती. वाढत्या वजनाच्या त्रासामुळे दीपिकाने वर्षभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण याच गोष्टीचा वापर करत दीपिकाने जगाला तिची दखल घ्यायला भाग पाडलंय

दीपिकाचं वजन कसं वाढलं?

मिस युनिव्हर्सच्या प्राथमिक स्पर्धेच्या फेरीत दीपिकाचं व्यक्तिमत्व पाहून सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. रॅम्प वॉक करताना तिने निरोगी शरीर आणि सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. तिचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाईट सवयी नाही तर काही हार्मोनल समस्यांमुळे दीपिकाचं वजन वाढलं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि PCOS बद्दल जागरुकता पसरविण्याचं कार्य ती करते.

सामाजिक कार्यातही जेनचा सहभाग

जेन दीपिका एक प्लस साइज मॉडेल आहे. ती मुळची नेपाळची आहे. दीपिका मिस नेपाळ झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली प्लस साइज मॉडेल आहे. मिस युनिव्हर्स 2023 मध्ये सहभागी होऊन, तिने शरीराचा आकार आणि आपल्या शरीराचा स्वीकार यासंबंधित सर्व पुर्वग्रह तोडले आहेत. मॉडेल असण्यासोबतच दीपिका एक नर्स आणि बिझनेस डेव्हलपर देखील आहे. ती महिलांच्या हार्मोनल आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्याचे काम करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()