जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) लवकरच आपल्याला नव्या अवतारात दिसणार आहे,आणि तिचा तो नवीन अवतार सगळ्यांनाच शॉक करणारा असेल. सिटी गर्ल जान्हवी कपूर लवकरच बिहारच्या एका गरीब पण असामान्य मुलीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. जिला आयुष्य कसं जगायचं हे उत्तम ठाऊक आहे, कठीण प्रसंगात आयुष्य कंठत असूनही ती खूश असते. , जान्हवी या सिनेमात आपल्याला शीव्या देताना दिसणार आहे,ते देखील बिहारी अंदाजात.(Janhavi Kapoor trained extensively for Bihari diction for her upcoming film 'Good Luck Jerry').
'गूडलक जेरी'(Good Luck Jerry) साठी जान्हवीने स्पेशल ट्रेनिंग घेतलं आहे. जिथे ती बिहारी लेहेजात बोलताना दिसेल,अगदी शिव्या देखील देताना दिसेल. सिनेमातील आपल्या बोलण्याच्या स्टाइलवर कमेंट देताना जा्हवी कपूर म्हणाली, ''मी बिहारी बोलण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतलं आहे. मला गणेश सर आणि मिस्टर विनोद नावाचे प्रशिक्षक या भाषेचं खास ट्रेनिंग देत होते. मी एका वर्कशॉपमध्ये देखील भाग घेतला होता. बिहारी गाण्यांची तर मी पारायणं केली. माझ्या प्रशिक्षकांनी माझ्याकडून असा अभ्यास करुन घेतला ज्याच्या ट्रेनिंग दरम्यान ते माझ्याकडून बिहारी शिव्या देखील बोलून घ्यायचे. तो सेशन भलताच मजेदार होता. मला माझ्या देशातील या भाषेचं ज्ञान करवून दिल्याबद्दल मी माझ्या प्रशिक्षकांची आभारी आहे.''
डिस्ने + हॉटस्टारवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. वेगळ्या पद्धतीचा कॉमेडी जॉनर असलेला 'गूडलक जेरी' एकदम दिलखुश करणारा सिनेमा ठरेल असं सिनेमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. 'गूडलक जेरी' हा एका तरुण मुलीच्या आयुष्याभोवती फिरणारा सिनेमा आहे. सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा जेरी आणि तिचा संघर्ष दाखवला गेला आहे. ती मुलगी कसं आपल्या आजारी आईचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत पुढे जाते यावर सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. असंख्य चढ-उतारांनी भरलेल्या जेरीचं आयुष्य आणि कोणत्याही पाठिंब्याविना तिनं केलेला संघर्षांचा सामना अशी गंभीर स्टोरी लाइन असली तरी अधनंमधनं पेरलेले कॉमेडी सीन्स सिनेमात रंग भरतात,असं मेकर्सचं म्हणणं आहे.
दिग्दर्शकानं सांगितलं आहे,''जेव्हा तुम्हाला लिंबू मिळतो तेव्हा फक्त तुम्ही त्याचं लिंबू पाणी बनवत नाही,तर त्याचे अनेक उपयोग करून घेता. 'गूडलक जेरी' सिनेमाचं कथानकही तसंच आहे. मात्र या गंभीर विषयाला कॉमेडी अंदाजात सादर केलं आहे''.
सिनेमात जान्हवी कपूरसोबत दीपक डोबरियाल,मीता वशिष्ठ,नीरज सूद,सुशांत सिंग असे कलाकार आहेत. सिद्धार्थ सेन आणि आनंद एल राय यांच्या कलर येलो प्रॉडक्शन,लाइका प्रॉडक्शनची निर्मिती आणि महावीर जैन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा २९ जुलै,२०२२ रोजी डिस्ने + हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.