Janhvi Kapoor: "आजही मी तुला सर्वत्र…", श्रीदेवी यांच्यासाठी जान्हवीने शेअर केली भावनिक पोस्ट

आता आईची आठवण करून जान्हवी कपूरने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
janhvi kapoor and sridevi
janhvi kapoor and sridevi Sakal
Updated on

जान्हवी कपूर 5 वर्षांनंतरही आई श्रीदेवीच्या निधनाच्या दुःखातून बाहेर पडू शकलेली नाही. पुण्यतिथीपूर्वी तिने श्रीदेवी यांची आठवण काढली. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचे पाच वर्षांपूर्वी २४ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये निधन झाले. आता आईची आठवण करून जान्हवी कपूरने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवी कपूरने तिची आई श्री देवीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की ती अजूनही तिला शोधत आहे. जान्हवीने म्हटले की, "मम्मा मी अजूनही तुला सगळीकडे शोधत आहे… सध्या मी ते सर्व करते आहे ज्याचा तुला अभिमान वाटेल…मी जे काही करते त्याची सुरूवात तुझ्यापासून करते आणि शेवटीही". जान्हवी कपूर हिच्या या पोस्टमध्ये अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहतेही जान्हवी कपूर हिची पोस्ट वाचून भावनिक झाले आहेत.

janhvi kapoor and sridevi
Kangana On Nepotism: 'अशा लोकांना...', आलिया-रणबीरला पुरस्कार मिळताच कंगनाचं डोकं फिरलं!

जान्हवीच्या या पोस्टवर बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. आथिया शेट्टी, वरुण शर्मा, करण जोहर, मनीष मल्होत्रा, रकुल प्रीत सिंह यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच बोनी कपूर यांनीही श्रीदेवी यांच्या आठवणीमध्ये भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवीचा मिली हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. मिली या चित्रपटाचे जान्हवीने जोरदार प्रमोशनही केले होते. पण, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि जान्हवीचा मिली हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

बोनी कपूर यांनी स्वत: मिली या चित्रपटाची निर्मिती केली होती. मिली या चित्रपटासोबतच सोनाक्षी सिन्हा हिचा डबल XL आणि कतरिना कैफ हिचा फोन भूत रिलीज झाले होते. हे तिन्ही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()