Arjun Kapoor सोबतचं पहिलं रक्षाबंधन आठवून जान्हवी झाली भावूक; म्हणाली...

अर्जुन कपूर आपली सख्खी बहिण अंशुलासोबतच सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशीसोबतही खूप छान बॉन्ड शेअर करतो.
Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most specialGoogle
Updated on

Janhvi Kapoor & Arjun Kapoor Rakshabandhan 2022: गेल्या २ वर्षात कोरोनामुळं सणांचा उत्साह फार काही पहायला मिळाला . अगदी सर्वसामान्यच काय तर सेलिब्रिटींचं देखील तेच म्हणणं आहे. लोक आपल्यांपासून दुरावले होते आणि सगळ्यांना बंद घरात राहून एकटेपणातच सण साजरे करावे लागत होते. पण आता लॉकडाऊन संपलं,कोरोनाचा प्रादु्र्भाव कमी झाला तसतसं जनजीवन पूर्वपदावर आलं. आता यावर्षी रक्षाबंधनच्या सणाला पुन्हा सगळं वातावरण आनंदून जाणार आहे. ११ ऑगस्टला रक्षाबंधन हा सण देशभरात साजरा केला जाईल. अगदी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या सणाचा आनंद घेताना दिसतील. जान्हवी कपूर देखील या खास दिवशी आपल्या भावा-बहिणीसोबत धम्माल करत एकत्र हा सण साजरा करताना दिसणार आहे. जान्हवी अर्जुन कपूर,अंशुला,खुशी कपूर आणि आपल्या इतर चुलत भावंडांसोबत यंदाची रक्षाबंधन(Rakshabandhan) साजरी करताना दिसेल.

Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
Laal Singh Chaddha मध्ये शाहरुख खानही, भूमिकेसाठी आमिरने असं मनवलं बादशहाला

जान्हवी म्हणाली,''माझ्यासाठी रक्षाबंधन हा सण खूप खास आहे. या सणाला पूर्ण कुटुंब एकत्र येतं, यावेळी कामात कोणी कितीही व्यस्त असला तरी याचा कोणावरच काही फरक पडत नाही. सगळे वेळात वेळ काढून एकत्र जमतात. आणि आपल्या कुटुंबाला आपल्या आजुबाजूला पाहिल्यावर खूप छान वाटतं. आणि हे क्षण कुठे रोज रोज आपल्या आयुष्यात येतात. हे एखाद्या लक्झुरी सारखे असतात''.

Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
स्वतःच्याच चित्रपटाविषयी अक्षयचे धक्कादायक विधान..

जान्हवी पुढे म्हणाली,''आम्ही दरवर्षी संजय अंकल (संजय कपूर) यांच्या घरी जेवतो किंवा अनिल अंकलच्या(अनिल कपूर) घरी किंवा मग आजीच्या घरी. यावर्षी देखील असं काहीतरी स्पेशल प्लॅनिंग आहे. आमच्यासाठी मोठी मेजवानी ठरतो हा दिवस. सेलिब्रेशन दरवर्षीसारखंच असणार,पण सगळे एकत्र असू तेव्हा खूप धम्माल येणार हे महत्त्वाचं. मी आशा करते यावर्षी देखील आम्ही असंच काही मस्त प्लॅन करू''.

Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
Hum Do, Hamare Baarah: वादग्रस्त पोस्टरवर अन्नू कपूर चुप्पी तोडत म्हणाले...

जान्हवीनं तिच्या आतापर्यंतच्या रक्षाबंधनच्या काही खास आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, ''जेव्हा मी पहिल्यांदा अर्जुन भैय्या(अर्जुन कपूर) ला राखी बांधली होती ती माझ्या आजतागायत लक्षात आहे. तो क्षण माझ्यासाठी स्पेशल होता. खूप वर्षापू्र्वी हे घडलं नाही, अगदी काहीच वर्षापूर्वी पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे''.

Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
मानलं 'या' अभिनेत्रींना, चक्क आमिरला केलेलं रीजेक्ट...

जान्हवी हे देखील म्हणाली की,''आपल्या भावा-बहिणीच्या सोबत आपण असणं यापेक्षा सुरक्षित भावना कोणतीच नाही किंवा कोणी ती देऊ शकत नाही. मला वाटतं माझ्या भावा-बहिणीकडून मिळणाऱ्या प्रेमानेच मी वर्षागणिक अधिक सक्षम बनत चालले आहे. आणि हे गेल्या काही वर्षात घडत गेलं आहे. मी आणि खुशी एकमेकींविषयी खुप प्रोटेक्टिव्ह होतो पण आता यात दोन जणं अजून सामिल झाले आहेत ते म्हणजे अर्जुन भय्या आणि अंशुला दीदी. आम्ही संकटात एकमेकांसोबत कायम राहू ही भावना मनात घट्ट रुजली आहे''.

Janhvi Kapoor recalls first rakshabandhan with arjun kapoor most special
Kareena ट्वीटरवर का नाही?, म्हणाली,'तिथे फक्त अशीच लोकं येतात ज्यांना...'

जान्हवी असं देखील म्हणाली की,''मी भाग्यवान आहे की मला मोठे भाऊ-बहिण आहेत. ते मला नेहमी मार्गदर्शन करतील याची मला आशा आहे. त्यांच्या अनुभवातून मी शिकेन कारण त्यांनी माझ्यापेक्षा जास्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे. तसंच खुशी माझ्यापेक्षा लहान आहे तर मी तिला माझ्या अनुभवातून शिकवेन. जे आमच्या सगळ्यांच्या भल्याचं राहिल. मी माझ्या भावंडांसाठी प्रार्थना करते की,ते आयुष्यात असेच पुढे जात राहो,त्यांना यश मिळो''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()