'मिस यू पट्या!' दिवंगत प्रदीप पटवर्धन आणि गिरगावची दहीहंडी,आहे खास कनेक्शन

दिवंगत प्रदीप पटवर्धन यांचा गेल्यावर्षीचा चाळीतील दहीहंडी सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते धमाल पारंपरिक डान्स करताना दिसत आहेत.
Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan  old video viral where he was dancing in Girgaon dahi handi
Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan old video viral where he was dancing in Girgaon dahi handiEsakal
Updated on

Pradeep patwardhan Dahihandi Video Viral: कोरोनामुळे तब्बल २ वर्ष सणांचे सेलिब्रेशन हे आपापल्या घरापुरतं सीमीत होतं. यंदा मात्र प्रत्येकजण परंपरेप्रमाणं घराचा व्हरांडा ओलांडत प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन करताना दिसणार. दहीहंडी हा सण यंदा दोन वर्षांनी नेहमीप्रमाणे अनुभवता येणार याचा आनंद काही औरच. पुन्हा रचले जाणार मनोरे, पुन्हा कानावर पडणार गोविंदा आला रे चा सूर..वा सारं भन्नाट...त्यात गिरगाव म्हणजे अस्सल मुंबईतल्या छोट्या-मोठ्या दहीदहंड्यांचा मनमुराद आनंद लुटायला मिळणारं ठिकाण. गिरगावशी अनेक मराठी कलाकारांचं खास कनेक्शन. आज म्हणूनच प्रत्येक गिरगावकर मिस करतोय दिवंगत मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना. 'कुठे गेलास पट्या' असं आज प्रत्येक गिरगावकर म्हणतोय? याचं कारण आहे पटवर्धनांचे गिरगावच्या दहीहंडीशी(Janmashtami) असलेलं खास कनेक्शन,चला जाणून घेऊया. (Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan old video viral where he was dancing in Girgaon dahi handi)

Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan  old video viral where he was dancing in Girgaon dahi handi
एक परफॉर्मन्स किंवा नुसती भेट; दहीहंडीला कोणता कलाकार किती घेतो मानधन, वाचा

प्रसिद्ध मराठी कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे ९ ऑगस्ट,२०२२ रोजी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. प्रदीप पटवर्धन मूळचे गिरगावचे. गिरगावशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यानं जसं मराठी रंगभूमीचं नुकसान झालं असं लोक म्हणतायत,तसंच गिरगावकरांचेही मोठे नुकसान झालं आहे. प्रदीप पटवर्धन म्हणजे संबंध गिरगावकरांसाठी 'पट्या'च. आज दहीहंडीला तर आपल्या या 'पट्याला' सगळेच मिस करत आहेत.

Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan  old video viral where he was dancing in Girgaon dahi handi
'तर तू रोहित शेट्टीकडे जा...'; असं रागात अनुराग कश्यप तापसीला का म्हणालेला?

गिरगावमध्ये चाळीत लहानाचं मोठं झालेल्या प्रदीप पटवर्धनांना अगदी स्टार झाल्यावरही तिथल्या चाळीचा,तिथल्या सणांच्या सेलिब्रेशनचा मोह काही सुटला नाही. ते अगदी गेल्या वर्षीपर्यंत दहीहंडी सणाला गिरगावात हजर व्हायचे अन् दरवर्षीच्या पंरपरेप्रमाणे आपल्या ठरलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी जाऊन दहा मिनिटं मस्त पारंपरिक दहीहंडीचा डान्स करायचे. त्यांना पाहण्यासाठी संबंध गिरगावकर ते दहा मिनिटं वेळ काढत आपल्या व्हरांड्यात उभ राहून,घराच्या खिडकीतून,गच्चीतून डोकवायचे. काही तर अगदी त्यांच्यासोबत येऊन तालही धरायचे. आज आपल्या लाडक्या पट्याची ती दहा मिनिटं आठवून प्रत्येक गिरगावकराच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. आज पट्या येणार नाही आणि त्याचा तो दहा मिनिटाचा झकास परफॉ़र्मन्स आपल्याला अनुभवता येणार नाही याचं दुःख गिरगावकरांच्या डोळ्यात दिसत आहे.

Janmashtami 2022: Marathi actor Pradeep Patwardhan  old video viral where he was dancing in Girgaon dahi handi
'Boycott Liger' मागणीनं धरला जोर; सिनेमातील 'आफत' गाणं लोकांना खटकलं म्हणे..

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर त्यांचा एक गिरगावमधील दहीहंडी सेलिब्रेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. ज्यात प्रदीप पटवर्धन आपल्या जुन्या चाळीत दहीहंडीच्या दिवशी गेले होते आणि त्यांनी आपल्या चाळकरी शेजाऱ्यांसोबत तो सण साजरा केला होता. यात ते धम्माल नृत्य करताना दिसत आहेत. तो व्हिडीओ इथे बातमीत जोडलेला आहे.

सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या लाडक्या पट्याच्या या शेवटच्या दहीहंडी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत लोकांनी प्रदीप पटवर्धन यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. दहीहंडीला काहीच दिवस उरले असताना प्रदीप पटवर्धन यांचे जाणे गिरगावकरांना यामुळेच चटका लावून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.