Janmashtami 2023: स्वप्निल जोशी ते अक्षय कुमार... हे कलाकार श्रीकृष्णाची भुमिका साकारुन लोकप्रिय झाले

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कोणत्या अभिनेत्यांनी श्रीकृष्णाची भुमिका साकारली पाहा
Janmashtami 2023 special actors who played lord krushna in movies and serials
Janmashtami 2023 special actors who played lord krushna in movies and serialsSAKAL
Updated on

आज जन्माष्टमी. श्रीकृष्णाचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात अनेक भाविक भक्तांचं श्रीकृष्ण आराध्य दैवत आहे. भारतात ठिकठिकाणी श्रीकृष्णाची भव्यदिव्य मंदिरं आहेत.

दररोज या मंदिरांमध्ये पूजा अर्चा होऊन श्रीकृष्णाची आराधना केली जाते. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत जे श्रीकृष्णाची भुमिका साकारुन लोकप्रिय झाले आहेत. जाणुन घेऊ कोण आहेत ते कलाकार...

Nitish Bharadwaj: कृष्णाचा विषय निघाला की नितीश भारद्वाज यांची आठवण येते. महाभारत मालिकेत त्यांनी साकारलेला श्रीकृष्ण अजरामर झाला. इतकंच नव्हे आजवर त्यांनी अनेक सिनेमा, मालिका, नाटकांमधून कृष्णाची भूमिका साकारली आहे.

Akshay Kumar: OMG 2 गाजला. पण याच सिनेमाला पहिला भाग अर्थात फ माय गॉड OMG मध्ये अक्षय कुमारने श्रीकृष्णाची भूमिका साकारली. ही भूमिका लोकप्रिय आहे. श्रीकृष्ण सामान्य माणसाची मदत करायला अवतार घेतो आणि त्या माणसाला कशी मदत करतो याची धार्मिक कहाणी OMG मध्ये पाहायला मिळाली. अक्षय कुमारने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका चांगलीच गाजली

Swapnil Joshi: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी आज लोकप्रिय अभिनेता असला तरीही लहानपणापासून स्वप्नीलला खरी ओळख दिली ती श्रीकृष्णाच्या भूमिकेने. 19993 ला आलेल्या रामानंद सागर यांच्या श्रीकृष्णा मालिकेत स्वप्नील जोशीने कृष्णाची भूमिका साकारली होती. ती आजही लोकप्रिय आहे.

Sarvadaman D. Banerjee: रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत सर्वदमन बॅनर्जी यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. ही भूमिका लोकप्रिय झाली.

Sumedh Mudgalkar: अलीकडेच मराठमोळा अभिनेता सुमेध मुद्गलकरने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका चांगली गाजली. २०१८ ला प्रसारित झालेल्या राधा कृष्ण मालिकेत सुमेधने साकारलेला श्रीकृष्ण सर्वांना आवडला. खऱ्या अर्थाने नटखट आणि काहीसा मस्तीखोर कान्हा सुमेधने साकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.