Punjab 95 TIIFF : कोण आहे 'जसवंत सिंग खालरा'? 'पंजाब 95' एवढी का होतेय चर्चा?

मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची खूपच चर्चा होत आहे. तो विषय म्हणजे जसवंत सिंग खालरा.
Punjab 95 TIIFF
Punjab 95 TIIFF esakal
Updated on

Jaswant Singh Khalara Punjab 95 TIIFF : मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून एका गोष्टीची खूपच चर्चा होत आहे. तो विषय म्हणजे जसवंत सिंग खालरा. पंजाब ९५च्या माध्यमातून त्या विषयाला वाचा फोडण्यात आली आहे. काही वर्षांपासून खालरा यांच्याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होताना दिसते.

सोशल मीडियावर पुन्हा एकदा ह्युमन राइट एक्टिविस्ट 'जसवंत सिंग खालरा' यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पंजाब 95' ची जोरदार चर्चा आहे. इंडस्ट्रीला अनेक अप्रतिम चित्रपट दिल्यानंतर, 'रॉनी स्क्रूवाला' त्याचा पुढचा चित्रपट, 'पंजाब 95' द्वारे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. 'दिलजीत दोसांझ' याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा जगभरामध्ये लोकप्रतिष्ठित टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (TIFF) मध्ये भारतातून भव्य प्रीमियर होणार आहे.

Punjab 95 TIIFF
Shah Rukh Khan Birthday: 'चक दे इंडिया'! किंग खानच्या हातात ट्रॉफी, यावर्षी भारत वर्ल्ड कप जिंकणारच!

TIFF 2023 मधील चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरपर्यंतचे चित्र स्पष्ट आहे, कारण प्रेक्षक मोठ्या पडद्यावर या आकर्षक कथेचे साक्षीदार होण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा सिनेमाच्या उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पंजाब 95 जागतिक चित्रपट प्रेमींमध्ये छाप पाडण्यासाठी सज्ज आहे.

Punjab 95 TIIFF
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

पंजाब 95 चे दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केले आहे आणि रॉनी स्क्रूवाला यांनी मॅकगफिन पिक्चर्सच्या सहकार्याने निर्मिती केली आहे.गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकृतींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. त्या कलाकृती सिनेरसिक आणि अभ्यासकांच्या उत्सुकतेचा विषय आहे. भारतीय चित्रपट गेल्या काही वर्षांपासून जागतिक पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.