Javed Akhtar on Animal: "हे खुपच धोकादायक!" जावेद अख्तर रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'वर का भडकले?

जावेद अख्तर यांनी औरंगाबाद येथील अजिंठा एलोरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक चित्रपटांबद्दल भाष्य केलं, जिथे त्यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाबाबतही चर्चा केली.
Javed Akhtar Controversial statement
Javed Akhtar Controversial statement Esakal
Updated on

Javed Akhtar on Animal: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर रश्मिका मंदान्नाच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी 'अॅनिमल'ला खुप पसंती दिली. तर दुसरीकडे अ‍ॅनिमलमुळे खुपच वादही झाला.

मात्र या वादाचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला नाही. अनेकांना चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओलचा अभिनय खूप आवडला आहे. तर अनेकांना चित्रपटाची कथा फारशी आवडली नाही. बऱ्याच लोकांनी अॅनिमल'वर टीका केली. आता यात आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे जावेद अख्तर.

Javed Akhtar Controversial statement
Bigg Boss 17: बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! अभिषेक इज बॅक तर...

जावेद अख्तर हे बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये त्याचे नाव येते. आपल्याला जे योग्य वाटते त्यावर ठाम राहणं हा अख्तर यांचा स्वभाव आहे. त्यातच आता त्यांनी औरंगाबाद येथील अजिंठा एलोरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अनेक चित्रपटांबद्दल भाष्य केलं, जिथे त्यांनी 'अ‍ॅनिमल' चित्रपटाबाबतही चर्चा केली.

Javed Akhtar Controversial statement
Prasad Oak: मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसाद ओकची भेट घेऊन केलं अभिनंदन! कारण ठरलं खास

जावेद अख्तर यांनी अॅनिमलबद्दल सांगितले की, 'जर असा एखादा चित्रपट असेल ज्यामध्ये एक पुरुष एखाद्या महिलेला म्हणतो, 'तू माझे बूट चाट' याशिवाय हाच पुरुष म्हणतो, या महिलेला मारण्यात काय नुकसान आहे? आणि असे चित्रपट सुपरहिट होत असतील तर ही अत्यंत धोकादायक बाब आहे. सध्या जावेद अख्तर यांच्या वक्तव्यांची सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

Javed Akhtar Controversial statement
Kiran Mane : अभिनेते किरण माने हाती बांधणार शिवबंधन; आज ठाकरे गटात करणार प्रवेश

जावेद अख्तर यांनी चित्रपटाचे नाव घेतले नसले तरी रणबीर कपूरच्या काही सीनकडे लक्ष वेधले आहे, जिथे रणबीर कपूर तृप्ती डिमरीला त्याचे बूट चाटायला सांगतो.

'चोली के पीचे क्या है' या गाण्याचा संदर्भ देताना ते म्हणाले की, जेव्हा हे गाणे आले तेव्हा करोडो लोकांनी त्याला पसंती केले. हे गाणं आलं आणि हिट झालं, ही गोष्ट खूप भीतीदायक आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट हिट बनवायचे हे ठरवण्याची जबाबदारी सिनेप्रेमींची आहे. सध्या जावेद अख्तर यांच्या वक्तव्यांची सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.