Javed Akhtar: "जुन्या गाण्याचे रिमिक्स करणं म्हणजे ताजमहालमध्ये डिस्को वाजवल्यासारख"! जावेद अख्तर बरसले


Javed Akhtar:
Javed Akhtar: esakal
Updated on

Javed Akhtar On Rap Remixes of Classic Songs: बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये त्याचे नाव येते. आपल्याला जे योग्य वाटते त्यावर ठाम राहणं हा अख्तर यांचा स्वभाव आहे.


Javed Akhtar:
Matthew Perry: मॅथ्यू पेरीच्या मृत्यूनंतर कुटुंबानं सोडलं मौन! प्रतिक्रिया चर्चेत

ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक म्हणुन जावेद अख्तर लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामासाठी जावेद अख्तर यांना ओळखलं जाते.

जावेद अख्तर यांचा राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण यासह अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. आता सध्या जावेद अख्तर पुन्हा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुन्या क्लासिक गाण्यांचे रिमिक्स करण्याच्या ट्रेंडबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

क्लासिक गाण्यांचे रिमिक्स करण्याबाबात जावेद अख्तर म्हणाले की, "जुन्या गाण्यांना रिमिक्स केल्यास त्यांना कोणतीही अडचण नाही, परंतु गाण्यांमध्ये जोडलेले कमर्शियल पैलू गाण्याची संपूर्ण मजा खराब करतात. हे असं करणं म्हणजे ताजमहालमध्ये डिस्को गाणे वाजवण्यासारखे आहे."


Javed Akhtar:
Vishnu Manchu: प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्याचा शुटिंग दरम्यान अपघात! हाताला गंभीर दुखापत

जावेद अख्तर म्हणाले, "भूतकाळाच्या आठवणी जपणे, त्याला महत्त्व देणं, त्यांचे आयुष्य टिकवणे यात काहीही चुकीचे नाही. याला प्रोत्साहन दिले पाहिजे , परंतु पैसे कमवण्यासाठी जुन्या गोष्टींचा वापर करणं ही चांगली गोष्ट नाही.

कमीत कमी त्याची प्रतिष्ठा राखा. तुम्ही सुंदर बोल आणि चांगला अर्थ असलेले गाणे घेतात आणि मग त्यात तुमचे स्वतःचे विचित्र कडवे जोडतात. असं होत नाही.

हे असं करणे म्हणजे अजिंठ्याला सायकेडेलिक लाइट्स किंवा ताजमहालला डिस्को म्युझिक जोडण्यासारखे आहे. हे करणं योग्य नाही."


Javed Akhtar:
Kiran Mane on Manoj Jarange: "संविधान गुंडाळू पहाणाऱ्या या व्यवस्थेला..."; मराठा आरक्षणासंदर्भात किरण मानेंची रोखठोक पोस्ट चर्चेत

पुढे जावेद अख्तर म्हणतात की, "महान गायक, लेखक, संगीतकारांची ही अविस्मरणीय गाणी आहेत, तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे.

हा सांस्कृतिक वारसा आहे. तुम्हाला रिमिक्स करायचे आहे तर नक्की करा मात्र नवीन वाद्यवृंद आणि गाण्यासह ते करावं, त्यात काही अडचण नाही.

तुम्ही के.एल. सहगलचे गाणी घ्या आणि अरिजितला ते गाण्यास लावा, ते चांगले आहे, पण तुम्ही ते गाणे घेतल्यानंतर त्याच्या मध्ये रॅप वापरणं चुकीचं आहे तसं करु नका."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.