Jawan Box Office Collection Day 4: शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर इतिहास गाजवायला सुरुवात केलीय. शाहरुख खानच्या जवानने पहिल्या विकेंडचा सामना केलाय.
यावेळी जवानने पहिल्याच विकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई केलीय. जवानचा शनिवार - रविवार मिळून विकेंडला छप्परफाड कमाई केलीय. जाणुन घ्या.
(jawan box office collection weekend day 4)
जवानचं विकेंड बॉक्स ऑफीस कलेक्शन
जवानने भारतात ₹ 75 कोटींमध्ये ओपनिंग केले होते. ज्यात 65.5 कोटी हिंदीतून आले होते आणि बाकीचे तामिळ आणि तेलुगू आवृत्त्यांमधून आले होते. शुक्रवारी ₹ 53.23 कोटी आणि शनिवारी ₹ 77.83 कोटींची कमाई जवानने केली. रविवारी 81 कोटींच्या कलेक्शनसह, Sacnilk.com नुसार चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे ₹287 कोटी आहे.
या अहवालात पुढे म्हटले आहे की, जवानच्या हिंदी शोसाठी एकूण 70.77 टक्के, तामिळ शोसाठी 53.71 टक्के आणि तेलुगू शोसाठी 68.79 टक्के व्यवसाय होता. अशाप्रकारे अवघ्या ४ दिवसात जवानने २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. याशिवाय जगभरात जवानने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचं बोललं जातंय.
गुगलचा जवानला सलाम
जवान रिलीज झाला आणि शाहरुखच्या फॅन्सनी सिनेमा डोक्यावर घेतला. बॉलीवूड, टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शाहरुखचे कौतुक केले आहे. त्यात बाहुबली, RRR फेम एस एस राजामौलींनी देखील किंग खानला शुभेच्छा दिल्या आहेत. आपण शाहरुखला बॉक्स ऑफिसचा बादशाह का म्हणतो याचे कारणही राजामौलींनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
शाहरुखचा जवानची इतकी चर्चा आहे की अगदी गुगलने देखील किंग खानच्या जवानची दखल घेतली आहे. गुगलच्या होमपेजवर जवानची थीम ठेवत त्याला शाहरुखचा आवाज दिला आहे. त्याचे स्क्रीन शॉट देखील वेगानं व्हायरल होत आहे. गुगलनं देखील एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. अशाप्रकारे येत्या दिवसांत जवान हा वेगळा विक्रम करणार अशी चर्चा रंगली आहे.
शाहरुखचा जवान गदर 2 चा रेकॉर्ड मोडणार?
शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. त्यामुळे आता शाहरुखचा जवान त्याच्या पठाणचा आणि सनी देओलच्या गदरचा रेकॉर्ड मोडू शकतो का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.