Jawan Controversy : शाहरुखचा 'जवान' वादाच्या भोवऱ्यात, करणी सेना संतापली! काय आहे कारण?

यापूर्वी देखील शाहरुखच्या पठाण चित्रपटावरुन गदारोळ झाल्याचे दिसून आले होते.
Jawan Controversy
Jawan Controversy esakal
Updated on

Jawan Controversy arose over the dialogue of Shah Rukh Khan : किंग खानचा जवान प्रदर्शित होण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना त्यावरुन पुन्हा एक मोठा वाद समोर आला आहे. यापूर्वी देखील शाहरुखच्या पठाण चित्रपटावरुन गदारोळ झाल्याचे दिसून आले होते.

करणी सेनेनं शाहरुखच्या जवान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जवानचा ट्रेलर प्रदर्शित होऊन काही दिवस झाले असताना त्याला मिळालेला प्रतिसादही प्रचंड मोठा असल्याचे दिसून आले आहे. जवाननं प्रदर्शनापूर्वीच पठाणचा रेकॉर्ड मोडल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या प्री अॅडव्हान्स बुकींगला जो प्रतिसाद मिळतो आहे तो कमाल आहे. अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

पठाणमधील त्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद झाला होता. दीपिकानं परिधान केलेली ती बिकीनी धार्मिक भावना दुखावणाऱी ठरली होती. त्यानंतर पठाण बॉयकॉट असा हॅशटॅग ट्रेंडही करताना दिसत होता. एवढे असताना देखील शाहरुखच्या पठाणनं बॉक्सऑफिसवर एक वेगळा विक्रम केल्याचे दिसून आले आहे. तब्बल एक हजार कोटींची कमाई पठाणनं केली होती. त्यात आता जवान पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून आले आहे.(Latest Marathi News)

करणी सेनेनं शाहरुखच्या जवानमधील एका डायलॉगवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शाहरुख अडचणीत सापडला आहे. एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भुखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था, या संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्या डायलॉगवरुन करणी सेनेनं आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्याविरोधात पोलिसांकडे धाव घेतली आहे.

Jawan Controversy
Jawan Shah Rukh Khan : 'हे माझं शेवटचं टक्कल, यानंतर मी पुन्हा कधीही....!' किंग खाननं सांगून टाकलं

करणी सेनेचे म्हणणे आहे तरी काय...

शाहरुखच्या त्या चित्रपटातील तो संवाद हा महाराणा प्रताप यांच्याशी असल्याचे करणी सेनेचे म्हणणे आहे. डायलॉगमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे सेनेच्या काही व्यक्तींचे मत आहे. करणी सेनेचे अध्यक्ष सुरजीत सिंह राठोड यांनी सांगितले की, त्या संवादावरुन आम्ही ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा डायलॉग जर शाहरुखनं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काढला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील अशा इशारा करणी सेनेनं दिला आहे.

Jawan Controversy
Jawan: शाहरुखच्या 'जवान'मुळे गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, 'या' कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.