Jawan Prevue Twitter Reaction: शाहरुख पण चोरटा! जवान मधले 'हे' सिन्स हुबेहूब कॉपी पेस्ट

Shah Rukh khan Latest Movie : चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज होताच जे येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे शाहरुख खानच्या चित्रपटाच्या या प्रिव्ह्यूचे खूप कौतुक होत आहे.
Jawan Prevue Twitter Reaction
Jawan Prevue Twitter ReactionEsakal
Updated on

Jawan Prevue Twitter Reaction: 'बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. पठाणच्या प्रचंड यशानंतर शाहरुखचे चाहते जवानच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर 'जवान' या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला आहे,

चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलीज होताच जे येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे शाहरुख खानच्या चित्रपटाच्या या प्रिव्ह्यूचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटाचे पूर्वावलोकन पाहिल्यानंतर, लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. तर दुसरीकडे अनेकांनी तीन मिनिटाच्या ट्रेलरमध्ये ठिग भर चुका काढल्या आहेत. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रिव्ह्यूमध्ये चुका शोधत अनेक ट्विट शेयर केले आहेत.

Jawan Prevue Twitter Reaction
Jawan Prevue: जवानमध्ये 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री! तुम्ही ओळखलं का?

चित्रपटाच्या प्रिव्ह्यूने तो येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचा हा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर चाहते 'जवान'ला सुपरहिट म्हणत आहेत. काही युजर्सनी 'जवान'चित्रपटातील सीन्स इतर चित्रपटातुन कॉपी केल्याचे म्हटले आहे.

Jawan Prevue Twitter Reaction
Tamannah Bhatiya Dance : भारतातही आहे एक शकिरा, 'त्या' डान्सनं चाहते भारावले!

एकानं त्याला साऊथ फिल्मची कॉपी म्हटलं आहे. शाहरुखचा माक्सवाला लूक अपरिचीत मुव्हीतुन चोरला असल्याच म्हटलं आहेत. तर बाहूबली आणि हॉलिवूड सिरिज Moon Knight मधुनही शाहरुखने लुक कॉपी केला आहे अशा चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत. नेटकऱ्यांनी दोन्ही चित्रपटातील सीन्सची तुलना करणाने फोटोही सोशल मिडियावर टाकले आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत विजय सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पदुकोण यांची झलक देखील दिसत आहे. ते ही दमदार अॅक्शन सीन करताना दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका ही कॅमिओ करणार असल्याचं बोलल जात आहे.

काही मिनिटाच्या या 'जवान' प्रिव्ह्यू शाहरुख खान हा त्याचा लुक चेंज करतांना दिसला आहे. तो अनेक वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

Jawan Prevue Twitter Reaction
Jawan SRK Movie : जवानचे 7 डायलॉग ऐकल्यावर, पठाणचं रेकॉर्ड ब्रेक होणार?

चित्रपटाचा ट्रेलर प्रथम थिएटरमध्ये आणि नंतर डिजिटल स्वरूपात प्रदर्शित केला जाईल.

जवानचा ट्रेलर हॉलिवूड चित्रपट मिशन इम्पॉसिबल 7 (मिशन: इम्पॉसिबल- डेड रॉकिंग पार्ट वन) सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.