Jawan Review Shah rukh Khan memes viral dialogue : शाहरुख खानचा जवान प्रदर्शित झाला आणि तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु केली आहे. जवानमध्ये शाहरुखच्या बोलण्यातून त्या गोष्टीचा राग जाणवत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ट्रेलरमधून तो डायलॉग समोर आला आणि किंग खानला काय म्हणायचे होते हे समजून गेले.
अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये शाहरुखनं त्याला ज्या गोष्टींविषयी मोकळेपणानं बोलायचे होते ते तो बोलून मोकळा झाला आहे. तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली होती. त्याला काही दिवस ऑर्थर रोड तुरुंगातही राहावे लागले होते. बॉलीवूडच्या किंग खानच्या मुलाला जेलमध्ये राहावे लागणे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट होती. शाहरुखच्या मनाला ही गोष्ट लागली आणि ते जवान पाहिल्यावर जाणवते.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
जवानमधून शाहरुखनं प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे अनेक गोष्टींवर हल्लाबोल केला आहे. जसं की देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत यावर सरकार काहीच कसे करत नाही, एखाद्याला मर्सिडिज घ्यायची असल्यास त्याला बँकेकडून मिळणारे कर्ज आणि त्याचा व्याजदर अन् जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर हवा असतो तेव्हा त्याला मिळणारे कर्ज आणि त्याचा व्याजदर याच्यात असणारी तफावर किंग खान जवानमधून सांगतो. तेव्हा त्याला काय सांगायचे आहे, त्याची भूमिका काय आहे हे कळून येते.
आपल्या देशातील आरोग्य सुविधा किती गलिच्छ आहे हे शाहरुखनं जवानमधून दाखवून दिले आहे. त्यानं त्यावर काय केलं पाहिजे हेही थेटपणे सांगितलं आहे. एकुणच देशातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे याचा उपायही त्यानं सांगितला आहे तो म्हणजे सरकार निवडताना लोकांनी हजार वेळा विचार केला पाहिजे. लोकं त्यांना एखादी वस्तू घेताना कित्येक प्रश्न विचारतात तेव्हा त्यांनी उंगली करणं सोडता कामा नये असे किंग खान सांगतो.
चाणाक्ष प्रेक्षकांनी, नेटकऱ्यांना मात्र वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यांनी शाहरुखला काय म्हणायचे आहे आणि त्याला कुणाला बोलायचे आहे हे त्यांना कळून चुकलं आहे. कुणाच्या कारकीर्दीमध्ये यासगळ्या गोष्टी घडल्या, त्यावेळी किंग खानला कुणी साथ दिली, त्याच्या विरोधात कोण होते, त्याला कुणी सहकार्य केले, सोशल मीडियावर त्याच्या विरोधात कुणी बदनामी केली होती. तपासकामात कुणी सर्वाधिक आडमुठेपणा केला होता हे सारे प्रश्न प्रेक्षकांना माहिती आहेत.
शाहरुख मोठ्या हुशारीनं वेगवेगळ्या डायलॉगच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. ट्रेलरमधून त्यानं आपला इरादा काय आहे हे स्पष्टपणे सांगितले होते. मुलाला हात लावण्यापूर्वी एकदा बापाला विचारलं का, असे म्हणून त्यानं आर्यन खानप्रकरणावर अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याच्या प्रतिक्रिया चाहते, नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. सोशल मीडियावर तर व्हायरल झालेल्या मीम्सनं देखील बिटविन द लाईन्स काय आहे हे ही सांगून टाकलं आहे.
पठाणच्या तुलनेत शाहरुखचा जवान हा अधिक लक्षवेधी असल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी देखील शाहरुखचं जवानमधील भूमिकेसाठी कौतुक केलं आहे. यावेळी शाहरुखच्या भूमिकेत वेगळेपणा जाणवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक वेगळी भूमिका घेऊन तो मैदानात उतरल्याची ती बाब चाहत्यांना आवडल्याच्या प्रतिक्रिया दिसून येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.