Jawan Shah Rukh Khan: "बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालचं मांजर", जवान पाहून किरण माने स्पष्टच म्हणाले

किरण मानेंनी जवान पाहून जळजळीत पोस्ट लिहीलंय
jawan shah rukh khan kiran mane post after watch jawan atlee srk sanya malhotra
jawan shah rukh khan kiran mane post after watch jawan atlee srk sanya malhotraSAKAL
Updated on

Kiran Mane on Jawan: किरण माने सोशल मिडीयावर सक्रीय असतात. किरण माने सतत सोशल मिडीयावर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर भाष्य करत असतात.

किरण मानेंनी नुकतंच शाहरुखचा जवान पाहून जळजळीत पोस्ट केलीय. किरण माने लिहीतात, "...'जवान'मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय,
"उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है...
जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !"
...हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो."

(kiran mane post after watch jawan)

jawan shah rukh khan kiran mane post after watch jawan atlee srk sanya malhotra
Jawan: शाहरुख खानच्या जवानमधील 'ती' गोष्ट गोरखपूरमधील सत्य घटनेवर आधारीत, वाचा सविस्तर

किरण माने पुढे लिहीतात,"जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं... आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होन्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं... आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो... तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे... 'टकराना ज़रूरी है' ! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं !

...शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, "हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय." वसीमभाई म्हन्ले,"शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास." शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला.
दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं."

किरण माने कलाकारांच्या विचारसरणीवर भाष्य करताना लिहीतात, "...खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात.

नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या... जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करनारे सिनेमे काढनार्‍या... भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून 'हाईप' केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा..."

किरण माने शेवटी लिहीतात, "पन प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना... म्हनूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नांवाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका... 'हम ज़िन्दा है... और ज़िन्दा नज़र आना चाहते है !"

अशाप्रकारे किरण मानेंनी पोस्ट लिहीताना शाहरुखच्या जवानचं कौतुक केलंय शिवाय सद्य परिस्थितीवर भाष्य केलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()