Jawan Shah Rukh Khan Movie Congress former minister Jayram Ramesh : सनी देओलच्या गदर २ वर तर संसदेकडून एक इ मेल निर्मात्यांना पाठवण्यात आला होता. त्यात हा चित्रपट देशाचे राष्ट्रपती यांना बघण्याची इच्छा आहे. असे सांगण्यात आले होते. याविषयी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी तर याविषयी खुलासा केला होता. आणि संसदेत गदर २ विषयी झालेल्या स्क्रिनिंगची माहितीही दिली होती.
गदर नंतर आता किंग खानचा जवान बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. त्यानं अवघ्या तीन दिवसांत दोनशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे. शाहरुखनं त्यातून काही राजकीय विधानं केल्याची चर्चा आहे. त्यानं भारतातील शेतकरी, त्यांच्या आत्महत्या, त्यांना मिळणारे कर्ज आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबत त्यांनी उचलेले टोकाचे पाऊल यावर किंग खान जवानमध्ये बोलताना दिसतो.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
श्रीमंतांना जेव्हा एखादी महागडी कार घ्यायची असते तेव्हा त्याचा व्याजदर आणि एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा असतो तेव्हाचा व्याजदर यात एवढा का फरक का आहे, याबरोबरच देशातील सार्वजनिक रुग्णालयांची अवस्था तुम्ही पाहिली आहे का, ती तशी का आहे, तुम्ही एखादी साधीशी गोष्ट विकत घेताना अनेक प्रश्न विचारता मग सरकार निवडून देताना विचार का करत नाही, असा प्रश्न किंग खान विचारताना दिसतो.
यासगळ्यात कॉग्रेसचे माजी मंत्री जयराम रमेश यांनी आताचे सरकार शाहरुखचा जवान संसदेत दाखविण्याची हिंमत करेल का, असा प्रश्न केला आहे. यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे. शाहरुखनं पहिल्यांदाच त्याच्या चित्रपटातून इतक्या उघडपणे राजकीय भाष्य केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याच्यावर एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना काही जणांनी मात्र याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.
जे तुमच्याकडे आता मतं मागत आहेत त्यांना विचारा की, पुढील पाच वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात, आतापर्यत तुम्ही काय केले आहे, शाहरुखच्या या संवादावरुन त्याच्यावर टीका होत आहे, काहींनी वेगवेगळे प्रश्नही उपस्थित केले आहे. आता केंद्रसरकार संसदेमध्ये जवानचे स्क्रिनिंग ठेवण्याची हिंमत दाखवू शकेल का, असा प्रश्न जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.