Jawan Star Cast Salary:
Jawan Star Cast Salary:Esakal

Jawan Star Cast Salary: आदिपुरुषसारख्या तगड्या बजेटमध्ये तयार झालाय शाहरुखचा 'जवान'! चित्रपटाचं बजेट अन् कोणी किती फी घेतली माहितीये...

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी असून हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं देखील बोललं जातयं. आता जवान चित्रपटात काम करण्यासाठी कोणत्या कलाकारने किती मानधन घेतलं आहे यावर एक नजर टाकूया..
Published on

Jawan Star Cast Salary: बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा 'जवान' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलिज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच या चित्रपटावर सेन्सॉरने कात्री चालवली आहे आणि 7 कट केले आहेत. तसेच, चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Jawan Star Cast Salary:
Ameesha Patel: 'सलमानच्या 'हिट अ‍ॅण्ड रन' केसमुळे माझं..', आमिषाचा धक्कादायक खुलासा

शाहरुखच्या पठाण ने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेक रेकॉर्ड तयार केले आता तशीच काहीशी अपेक्षा आता निर्माते आणि शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या जवान या चित्रपटापासून आहेत.

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचे बजेट सुमारे 300 कोटी असून हा शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं देखील बोललं जातयं. आता जवान चित्रपटात काम करण्यासाठी कोणत्या कलाकारने किती मानधन घेतलं आहे यावर एक नजर टाकूया..


(Latest Marathi News)

जवान सिनेमात शाहरुख खान हा डबल रोल करणार आहे. त्याने या चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांची तगडी रक्कम वसूल केली आहे. त्याचबरोबर चित्रपटातील नफ्यातही त्याचा काही हिस्सा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता शाहरुख खाननेच चित्रपटाच्या बजेटचा सर्वात मोठा हिस्सा घेतला आहेत.

Jawan Star Cast Salary:
Urfi Javed Video Viral : 'आमच्या घरातील कंगवे गेले कुठे?' उर्फीच्या त्या व्हिडिओनं नेटकरी हँग!

दक्षिण चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा ही देखील 'जवान' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून तिने या चित्रपटासाठी जवळपास 11 कोटी रुपये फी घेतली आहे.

तर चित्रपटात व्हिलनच्या भुमिकेत दिसणारे विजय सेतुपती यांनी या सिनेमासाठी तब्बल 21 कोटी रुपये घेतले आहेत.

तर या चित्रपटात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील कॅमिओ करणार आहे. तर चित्रपटात छोट्याशा कॅमिओसाठी तिने 25 ते 30 कोटी रुपये फी घेतल्याचं बोललं जात आहे.

विक्रमच्या गर्ल गँगमध्ये दिसणाऱ्या सान्या मल्होत्राने या चित्रपटातील भूमिकेसाठी सुमारे 1 ते 2 कोटी रुपये घेतले आहेत. ती या चित्रपटाच्या माध्यमातुन पहिल्यांदाच शाहरुखसोबत काम करणार आहे.

Jawan Star Cast Salary:
Shiv Thakare: 'फक्त तूच भावा, जिंकलसं'! समुद्र किनाऱ्यावर शिवची स्वच्छता मोहीम, चाहते भारावले

तर प्रियामणी हिने जवानमध्ये काम करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपये घेतले आहेत. कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरने जवानाच्या भूमिकेसाठी सुमारे 75 लाख रुपये घेतले आहेत. दक्षिण चित्रपटसृष्टीतील योगी बाबू यांनी शाहरुखच्या जवानसाठी 35 लाख रुपये घेतले आहेत.

'जवान' हा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्यात शाहरुख खानसोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.