Shah Rukh Khan-Sameer Wankhede Jawan Trailer: 'पठाण'नंतर बॉलिवूडचा बादशाह खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज सोशल मीडियावर त्याचा पुरावा सर्वांनीच पाहिला.
काही तासांपुर्वी शाहरुखच्या जवानचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आणि काही तासातच त्याचे व्ह्यूज मिलियन पार गेले. अॅटली दिग्दर्शित शाहरुखच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.
या चित्रपटात शाहरुख खान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. तर नयनतारा एका पोलिसाची भुमिका साकारत आहे. चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विजय सेतुपती देखील खतरनाक लूकमध्ये दिसताय.
'एक राजा था, भूखा-प्यासा घूम रहा था जंगल में...' या डायलॉगने ट्रेलरची सुरुवात झाली. 2 मिनिटे 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन, रोमान्स, सस्पेन्स, देशभक्ती सगळचं प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
ट्रेलर जवानचा मात्र ट्विटवर चर्चा ही शाहरुख खानची नाही तर समीर वानखेडेशी रंगली आहे. हा ट्रेलर रिलिज होताच चाहते चित्रपटातील डायलॉगला समीर वानखेडेंसोबत जोडत आहेत.
त्याला कारण ठरला तो ट्रेलरमधील एक खतरनाक डायलॉग. ज्यामध्ये शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये म्हणतो की , 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर...'. आता ट्विटवर हा डायलॉग खुपच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी हा संवाद मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी जोडला.
NCB माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणात अटक केली होती. तेव्हा या प्रकरणाची खुप चर्चाही झाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.
शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटातील अनेक धमाकेदार गाणीही रिलिज झाली. ज्यात शाहरुख खानसोबत दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियमणी, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही हे पाहणे उत्सूकतेचे ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.