Jay Bhim National Awards Controversy : 'जय भीम'ला पुरस्कार का दिला नाही ते सांगा? पुन्हा नव्या वादाला सुरुवात

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जय भीम या चित्रपटाला नेमक्या कोणत्या कारणामुळे डावलण्यात आले याची विचारणा काही सेलिब्रेटींनी केली होती.
Veteran Cinematographer P.C Sreeram Reacts To Jai Bhim Letdown At
Veteran Cinematographer P.C Sreeram Reacts To Jai Bhim Letdown At esakal
Updated on

Veteran Cinematographer P.C Sreeram Reacts To Jai Bhim Letdown At : त्याचं झालं असं की, नुकतेच ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले. मात्र ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती त्या जय भीमला डावलण्यात आल्यानं अनेकांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे.

साऊथ मधील कित्येक दिग्गज सेलिब्रेटींनी जय भीमला पुरस्कार का दिला नाही याविषयी विचारणा केली आहे. यात प्रसिद्ध अभिनेता नानी चाही समावेश आहे. जय भीम या चित्रपटाला आयएमडीबी कडून आठ पेक्षा अधिक रेटिंग होते. सोशल मीडियावर या चित्रपटाची सर्वाधिक चर्चाही होती. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये देखील जय भीमची दखल घेण्यात आली होती.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जय भीम या चित्रपटाला नेमक्या कोणत्या कारणामुळे डावलण्यात आले याची विचारणा काही सेलिब्रेटींनी केली होती. काही राजकीय विचारधारेचा, सामाजिक विचारांना प्रश्न ज्या चित्रपटानं उपस्थित केले त्या चित्रपटाला कदाचित पुरस्कार देणं हे जे कुणी परिक्षक होते त्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे की काय यावर्षी देखील जय भीम पुरस्काराला हुलकावणी दिली.

यासगळ्यात प्रसिद्ध छायाचित्रकार पी सी श्रीराम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जय भीमला राष्ट्रीय पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न विचारुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात करून दिली आहे. आपण अजूनही नेमक्या कोणत्या विषयावरच्या चित्रपटांना प्राधान्य देतो हे सांगता येईल का, सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये जय भीमचा समावेश करावा लागेल. मात्र त्याला पुन्हा एकदा डावलण्यात आले.

जय भीममध्ये सुर्यानं जो अभिनय केला त्याचेही कौतुक करावे लागेल. आम्ही सगळे एकाच क्षेत्रातून येतो ते म्हणजे चित्रपट निर्मिती. आणि त्यात जे काही चांगले घडते त्याचे कौतुक आपण करायला हवे. मात्र बऱ्याचदा जो कौतुकाचा धनी आहे त्यांचे ते होत नसल्याचे दिसून येते. अशा शब्दांत श्रीराम यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर जय भीम, द काश्मिर फाईल्स यावरुन वाद सुरु झाला आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतला नॅशनल अवॉर्ड न मिळाल्यानं तिच्यावरही टिप्पणी करण्यात आली आहे. यंदा आलियाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.