Jaya Bachchan: अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाला जवळपास 50 वर्षे होत आली. या दोघांनीही आपल्या सहजीवनात अनेक चढ उतार पाहिले, अनेक अडचणी आल्या पण कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. आज त्याच नात्याची गुपिते जया बच्चन यांनी आपल्या नातीच्या म्हणजे नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट सेशनमध्ये उघड केली आहेत.
(Jaya Bachchan reveals her and amitabh bachchan marriage secrets in navya naveli nanda podcast)
बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकांना माहिती आहे. राज्यसभेत देखील त्यांच्या शीघ्रकोपीपणाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी बोलायला आणि फोटो घेण्यासाठी तर कुणी जात नसल्याचे दिसून आले आहे. कायमच त्यांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो. आज मात्र त्या काहीशा इमोशनल आणि प्रेमाच्या गोष्टींवर बोलल्या आहेत. त्यांच्या लग्नाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे.
या पॉडकास्ट मध्ये जय बच्चन यांना नातीने विचारले, की आजोबांनी तुम्हाला कसे प्रपोज केले होते. त्यावेळी जया यांनी काही खास किस्से सांगितले, त्या म्हणाल्या, 'आम्ही असं ठरवलं होतं की जर आमचा 'जंजीर' चित्रपट हिट झाला, तर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एकत्र बाहेर फिरायला जायचं. त्यानंतर 'जंजीर' चित्रपट हिट झाला. त्यावेळी मी कोलकातामध्ये शूटिंगसाठी गेली होते, तेव्हा तुझ्या आजोबांचा म्हणजे अमिताभजींचा कॉल आला आणि ते म्हणाले जया एक समस्या आहे'
ते म्हणाले, 'तुझ्यासोबत फिरायला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी नकार दिला आहे. ते म्हणाले आहे, जर तुला जयासोबत फिरायला जायचं असेल तर तिच्याशी लग्न कर आणि मग जा. त्यावर ते म्हणाले तुला काय वाटतं? मी म्हटलं, आपण जर ऑक्टोबरमध्ये लग्न करण्याचा विचार करत होतो, तर जूनमध्येच करू.' त्यानुसार आम्ही ठरलेल्या तारखेच्या आधीच लग्न केलं.
पण त्यातही अमिताभ यांनी मला एक अट घातली. ते म्हणाले, 'मला अशी पत्नी पाहिजे, जी 9 ते 5 वेळेतच काम करेल. तुला दररोज काम करण्याची गरज नाही. तू तुझे प्रोजेक्ट्स योग्य व्यक्तींसोबतच केले पाहिजेस.' या अटी मी मान्य केल्या आणि 1973 मध्ये आम्ही लग्नगाठ बांधली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.