Jaya Bachchan Viral Video : 'आम्ही काही शाळेतली मुलं नाहीत, तुम्ही आम्हाला...' राज्यसभेत जया बच्चन यांचा संताप!

खासदार जया बच्चन (Jaya Bachchan Viral Video) यांचा राज्यसभेतील तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
Jaya Bachchan viral video
Jaya Bachchan viral video
Updated on

Jaya Bachchan viral video : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच त्यांच्या रोखठोक अंदाजासाठी ओळखल्या जातात. परखड व्यक्तिमत्वाच्या जया बच्चन यांच्या रागीटपणाचा अनुभव अनेक सेलिब्रेटींनी घेतला आहे. आता जयाजी यांचा राज्यसभेतील तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात त्यांनी सभापतींनाच सुनावल्याचे दिसून आले आहे.

त्याचं झालं असं की, राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना एका प्रश्नाच्या वेळी विरोधकांमध्ये गदारोळ झाल्याचे दिसून आले. त्यात सभापती यांना बोलू न दिल्यानं समाजवादी पार्टीच्या जया बच्चन यांनी तीव्र शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. नेमकं घडलं काय हे आपण जाणून घेऊयात...

प्रश्नोत्तराच्या त्या तासात विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू न दिल्यानं सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांना बसण्यास सांगितले. यावर जयाजी चांगल्याच भडकल्या. त्या म्हणाल्या की, आम्हाला जर सभापती किंवा उपसभापती यांनी बसण्यास सांगितले तर आम्ही ते ऐकू. पण बाकी कुणी काहीही सांगायला लागले तर ते कसे ऐकणार?

तुम्ही जर तुमचा मुद्दा व्यवस्थित सांगितला तर तो समजतो. पण तो नाही समजला तर आम्ही प्रश्न विचारणारच. आम्ही काही शाळेतील विद्यार्थी आहोत का बस म्हटल्यावर बसायचं, आमचे म्हणणे एवढेच आहे की, आम्हालाही योग्य तो आदर सभागृहात मिळायला हवा. अशा शब्दांत जयाजी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jaya Bachchan viral video
Kangana Ranaut: "मला कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा..."; अॅनिमलच्या दिग्दर्शकाला कंगना थेटच म्हणाली, पण नेमकं कारण काय?

प्रश्नोत्तराच्यावेळी झालेल्या गदारोळावरुन राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना बसण्यास सांगितले. त्याला दीपेंद्र हुड्डा यांनी विरोध केला. त्यावेळी जगदीप धनखड यांनी त्यांना म्हटले की, तुम्ही जया बच्चन यांचे प्रवक्ता नाही त्या देखील वरिष्ठ सदस्य आहे. त्यांचे समर्थन करण्याची तुम्हाला गरज नाही.

Jaya Bachchan viral video
Jaya Bachchan On Navya Naveli Nanda Show : 'खरं सांगू मला काहीही फरक पडत नाही पण...', नातीच्या शो मध्ये जयाजी स्पष्टच बोलल्या!

तुमच्या सारख्या अभिनेत्रीनं देखील कित्येक रिटेक घेतले असतीलच की.. अशी टिप्पणी धनखड यांनी यावेळी केली. त्यावेळी जयाजी पुन्हा बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावर पुन्हा सभापतींनी त्यांना म्ह्टले की, जयाजी तुम्ही वरिष्ठ सदस्य आहात. तसंही तुम्ही जे काही बोलता त्याचा देशात खूपच सन्मान होतो. मला माहिती आहे की, तुम्ही जे काही बोलता त्याचा नेहमीच आदर केला जातो. तुमच्या सारख्या अभिनेत्रीनं देखील कित्येक रिटेक घेतले असतीलच. त्यावेळी सभागृहात मोठा हशा पिकला.

Jaya Bachchan viral video
Fighter: फायटरमधील 'त्या' सीनमुळे नवा वाद; हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं थेट नोटीस पाठवली, काय आहे कारण?

जया बच्चन म्हणाल्या, आम्हाला जर सभापती किंवा उपसभापती यांनी बसण्यास सांगितले की, आम्ही ते ऐकुच. मात्र दुसरे सदस्य बोलायला लागल्यानंतर आमच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही का, सभापती महोदय तुम्ही आमच्या प्रश्नावर काही आक्षेप असल्यास सांगा आम्ही ते मान्य करु. असे जयाजी यांनी सभापतींच्या बोलण्यावर उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.