'जयेशभाई जोरदार' अडचणीतच; हायकोर्ट म्हणालं,'परवानगी मिळणार नाही जर...'

'जयेशभाई जोरदार' सिनेमातील गर्भलिंग निदान करणाऱ्या सीनवरुन हाय कोर्टात केस सुरु होती. त्याविषयी सुनावणी दरम्यान कोर्टानं महत्त्वाचा आदेश दिला आहे.
Jayeshbhai Jordaar Movie
Jayeshbhai Jordaar MovieGoogle
Updated on

रणवीर सिंगचा सिनेमा 'जयेशभाई जोरदार' १३ मे ला प्रदर्शित होत आहे आणि त्याआधीच कोर्टानं सिनेमातील एका वादग्रस्त सीनवरनं सुरु असलेल्या केससंदर्भात महत्त्वाचा निर्णय ऐकवला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमातील या सीनवर आक्षेप घेण्यात आला होता,ज्या सीनमध्ये गर्भलिंग निदान करणारी चाचणी दाखवण्यात आली होती. या सीनला ट्रेलर आणि सिनेमातून काढून टाकण्यासाठी प्रकाश पाठक नावाच्या वकीलांनी हाय कोर्टात(High Court) याचिका दाखल केली होती. यावर आता कोर्टानं निर्णय दिला आहे.

Jayeshbhai Jordaar Movie
उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

हाय कोर्टानं सांगितलं आहे की, अशा प्रकारच्या सीनला कोणत्याही डिसक्लेमर शिवाय दाखवलं जाऊ शकत नाही. किंवा गर्भनिदान चाचणीसंदर्भात जे निर्बंध आहेत त्याचं महत्त्व कमी करता येणार नाही. कोर्टानं निर्मात्यांना सांगितलं की गर्भ लिंग चाचणीला क्षुल्लक समजत त्याचं महत्त्व कमी होईल असं काहीही करु नये. अशा पद्धतीचं काहीही सिनेमात दाखवलं जाऊ नये. हाय कोर्टानं निर्मात्यांना सांगितलं आहे की, ''तुम्हाला सीन संदर्भात ज्या सूचना करण्यात आल्या आहेत,त्या पाळाव्यात. आम्ही तो पाहू किंवा स्टे सुद्धा आणू त्यावर. जोपर्यंत आम्ही स्वतः तो सीन पाहत नाही तोपर्यंत आम्हाला समजणार नाही की सिनेमात त्याचा संदर्भ नेमका काय आहे,तोपर्यंत या सीनला दाखवण्याची परवानगी मिळणार नाही''.

Jayeshbhai Jordaar Movie
सुनिल शेट्टी 'गुटखा किंग'! ट्वीटरवर रंगली चर्चा,काय आहे प्रकरण?

वादग्रस्त सीनसंदर्भात केलेल्या याचिकेत वकील पवन प्रकास पाठकनं म्हटलं होतं की,''हा सिनेमा जरी स्त्री भ्रूण हत्येविरोधात आणि स्त्री गर्भाला वाचवण्या संदर्भात भाष्य करत असला तरी यात लिंग निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंडच्या तंत्रज्ञानाला प्रमोट करण्यात आलं आहे,जे योग्य नाही''. याचिकेत म्हटलं होतं की,''अल्ट्रासाऊंड क्लीनिक मधील जो लिंग निदान करतानाचा सीन आहे त्याला सेंसर केल्याशिवाय दाखवलं गेलं आहे,जे चुकीचं आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान वरिष्ठ न्यायमूर्ती विपिनं सांघी आणि न्यायमूर्ती नविन चावला यांनी जयेशभाई जोरदार चा ट्रेलर पाहिल्यानंतर म्हटलं आहे की,'' ट्रेलरमध्ये तरी असं काही दाखवलं गेलेलं नाही ज्याने वाटेल की स्त्रीला लपून-छपून अल्ट्रासाऊंड क्लीनिकमध्ये नेलं गेलं आहे. पण या सीनला पाहून असं नक्कीच वाटू शकेल की कोणत्याही गरोदर स्त्रीला गर्भ लिंग निदान करण्यासाठी सहज सोनोग्राफी करण्यासाठी नेलं जाऊ शकतं''. अद्याप कोर्टात या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.

Jayeshbhai Jordaar Movie
'एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे

या सिनेमात रणवीर सिंग एक गुजराती व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमात रणवीर सोबत शालिनी पांड्ये ही दाक्षिणात्य सिनेमाची अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. तिचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमाला दिव्यांग ठक्करनं दिग्दर्शित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.