Yogita Chavan And Saorabh Choughule: 'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेनं बांधली लग्नगाठ; शेअर केला लग्नसोहळ्यातील फोटो

योगिता आणि सौरभ यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी योगिता आणि सौरभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Yogita Chavan And Saorabh Choughule
Yogita Chavan And Saorabh Choughuleesakal
Updated on

Yogita Chavan And Saorabh Choughule: छोट्या पडद्यावरील जीव माझा गुंतला (Jeev Majha Guntala) या मालिकेतील ऑन स्क्रिन जोडी आता खऱ्या आयुष्यात विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. नुकताच योगिता आणि सौरभ यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी योगिता आणि सौरभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

योगिता आणि सौरभ यांनी शेअर केला फोटो

योगिता आणि सौरभ यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सौरभ हा योगिताला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. "Forever Humsafar,
03.03.2024" असं कॅप्शन योगिता आणि सौरभ यांनी त्यांच्या फोटोला दिलं आहे.

रिल लाईफ जोडपं खऱ्या आयुष्यात झालं 'हमसफर'

योगिता आणि सौरभ यांनी जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा आणि मल्हार ही भूमिका साकारली. मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता योगिता आणि सौरभ हे रिल लाईफनंतर आता रिअल लाईफमध्ये देखील नवरा बायको झाले आहेत.

Yogita Chavan And Saorabh Choughule
Surbhi Chandna: इश्कबाज फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; करण शर्मासोबत बांधली लग्नगाठ

नवरी मिळे नवऱ्याला या मालिकेत देखील काम केलं आहे.तर सौरभनं रूप नगर की चीते या चित्रपटात काम केलं आहे. योगिता आणि सौरभ यांना जीव माझा गुंतला या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.