Jhimma 2: महाराष्ट्रात शुटिंग करायचं तर....झिम्माच्या दिग्दर्शकाची झणझणीत पोस्ट व्हायरल

महाराष्ट्रात शुटींग करणं किती अवघड आहे याचा खुलासा हेमंत ढोमेने केलाय
jhimma 2 director hemant dhome statement that marathi movies shooting very difficult in maharashtra
jhimma 2 director hemant dhome statement that marathi movies shooting very difficult in maharashtra SAKAL
Updated on

Jhimma 2: झिम्मा २ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. झिम्मा २ पाहण्यासाठी प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत आहेत. झिम्मा २ ने पुन्हा एकदा पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

झिम्मा २ चं दिग्दर्शन केलंय हेमंत ढोमेने. हेमंतने एका मुलाखतीत महाराष्ट्रात मराठी सिनेमांचं शुटींग करणं किती कठीण आहे, याचा खुलासा केलाय.

(jhimma 2 director hemant dhome statement that marathi movies shooting very difficult)

jhimma 2 director hemant dhome statement that marathi movies shooting very difficult in maharashtra
“We are engaged…” पूजा सावंतने दिली प्रेमाची कबुली? रिलेशनशीपचा केला खुलासा... कोण आहे स्पेशल व्यक्ती?

भारतातली सिस्टिम खुपच वाईट: हेमंत ढोमे

हेमंत ढोमेने एका मुलाखतीत खुलासा केलाय की, "भारतात शूट करायचं म्हटलं तर आपली सिस्टीम खूपच वाईट असल्याचं दिसून येतं. इथे पोलिसांना पैसे द्यावेच लागतात. मुंबईत शूट करा किंवा साताऱ्यात जाऊन शूट करा, पैसे देणं आलंच. शिवाय ग्रामपंचायतीलाही पैसे द्यावे लागतात. हजारो लोकेशन्स असतात त्यात कोणी म्हणतं माझं घरच दिसतंय, माझं दुकानच दिसतंय मग त्याला पैसे द्या. लंडनमध्ये मात्र सगळं खूप क्लिअर आहे.

लंडनमध्ये कामात व्यत्यय येत नाही: हेमंत ढोमे

हेमंत पुढे लिहीतो, "एकदा या जागेचं किंवा रस्त्याचं नाव लिहून दिलं की त्या जागेवर कुठेही शूट कर, काहीही कर कोणी काही म्हणणार नाही. परमिशन्स घेतानाच काय काय लागतं ते सगळं मेन्शन करायचं. कोणीही येऊन तुमच्या कामात व्यत्यय आणत नाही. नागरिक येऊन असंच प्रेमाने चौकशी करतात, फिल्मचं नाव विचारतात आणि जातात. म्हणून मला आणि इतरही निर्मात्यांना तिकडे जाऊन शूट करणं सोप्पं वाटतं."

झिम्मा 2 मध्ये तगड्या कलाकारांची फौज

कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत,  हेमंत ढोमे दिग्दर्शित तसेच सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर  यांच्या दमदार भुमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()