नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.
(Jhund movie actor Priyanshu Kshatriya arrested for theft by Nagpur city police)
प्रियांशूने नागपूर येथे दागिने लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांशू अवघ्या १८ वर्षांचा असून या गुन्ह्या प्रकरणी त्याला नागपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या राहत्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होते. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचे उघड केले आहे.'
नागपूर पोलिसांनी मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी प्रियांशूला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
यापूर्वीही प्रियांशूला रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. प्रियांशूच्या अटकेने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजली आहे. आता या प्रकरणार नागराज मंजुळे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. बिग बी म्हणजेच बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. वंचित वस्तीतील मुलं काय करू शकतात हे दाखवणारा हा चित्रपट होता. ‘झुंड’ या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले. या चित्रपटात प्रियांशू क्षत्रियने बाबू नावाचे पात्र साकारले होते. “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, हा त्याचा डायलॉग फारच लोकप्रिय ठरला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.