‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी तंतोतंत 'विजय बारसे' उभा केला

प्रा. विजय बारसे : हाच माझा सन्मान असल्याची भावना
jhund movie Amitabh Bachchan as Vijay Barase nagpur
jhund movie Amitabh Bachchan as Vijay Barase nagpursakal
Updated on

नागपूर : फुटबॉलच्या माध्यमातून झोपडपट्टीतील व्यक्तींचा व्यक्ती विकास हा माझा मूळ उद्देश होता. चित्रपटाची निर्मित होत असताना मूळ उद्देश कायम असावा ही माझी अट होती. काल मी चित्रपट पाहिला. तेव्हा मला खरच खूप आनंद झाला. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी तंतोतंत विजय बारसे उभा केला, अशी प्रतिक्रीया झुंड चित्रपटाचे खरे नायक प्रा. विजय बारसे यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित झुंड या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: ही भूमिका साकारली आहे. ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा साकारला ते खरे नायक प्रा. विजय बारसे हे अनेक दिवसांनंतर नागपूरकरांसमोर भरभरून बोलले. झुंड हा व्यक्तींचा व्यक्तीं समूह असतो. या समूहाला काही नियम घालून खेळाच्या मैदानावर उतरवले तर ती एक टीम होते. चोऱ्या करणारे, विविध व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांच्या अशाच झुंडीला खेळाच्या माध्यमातून वळण लावून त्यांचा व्यक्तिगत विकास साधण्याचे काम आपण केले. अमिताभ बच्चन यांनी खऱ्या विजयची भूमिका निभावली आहे.

झुंड या चित्रपटाचे ८० टक्के शूटिंग नागपूरला झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव विजय आहे; परंतु त्यांनी आपल्या जीवनात कदाचित पहिल्यांदाच खऱ्या विजयची (विजय बारसे) यांची भूमिका निभावली ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रा. बारसे यांनी सांगितले.

नेल्सन मंडलांनी थोपटली पाठ

दक्षिण आफ्रिकेत होमलेस वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मलाही सन्मानार्थ बोलावण्यात आले होते. एका मोठ्या स्टेडियममध्ये कार्यक्रम होता. मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष व मानवतावादी नेते नेल्सन मंडेला यांनी ‘मुला तू खूप चांगले काम करीत आहे’ असे म्हणत माझी पाठ थोपटली’. तो माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रा. बारसे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.