Jiah Khan Latest News जिया खान (Jiah Khan) आत्महत्या प्रकरणात दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांना कोर्टाकडून झटका बसला आहे. राबिया खान यांनी जिया प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे.
३ जून २०१३ रोजी जिया खान (Jiah Khan) मुंबईतील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. आईने जियाचा प्रियकर सूरज पांचोली याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. ९ वर्षे जुन्या प्रकरणात राबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खटला पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने राबिया खान यांची याचिका फेटाळून लावली. मुलीची हत्या (Murder) झाल्याचा आरोप राबिया खानने याचिकेत केला आहे. याचिकेत त्यांनी स्वतंत्र आणि विशेष एजन्सीद्वारे प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आवाहन केले होते. याला अमेरिकन तपास संस्था फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) मदत करेल.
या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात काही चुका झाल्या होत्या, असा युक्तिवाद वकील शेखर जगताप आणि सायरुचिता चौधरी यांनी केला. त्यानंतर राबिया खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि जुलै २०१४ मध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. मात्र, सीबीआयने त्याच चुका केल्या. त्यामुळे या प्रकरणाचा स्वतंत्र एजन्सींकडून पुन्हा तपास करण्याची मागणी करण्यात आली.
सीबीआयच्या तपासावर न्यायालयाचा विश्वास
न्यायमूर्ती एएस गडकरी व एमएन जाधव यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली. तसेच या प्रकरणातील सीबीआय तपासावर त्यांचा विश्वास असल्याचे सांगितले. सीबीआयतर्फे वकील संदेश पाटील यांनी युक्तिवाद केला की, एजन्सीने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास केला आहे. याचिकाकर्त्या राबिया खान यांनी अशा प्रकारची याचिका दाखल करून स्वत:चाच खटला कमजोर करीत आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याचिका फेटाळून लावत खंडपीठाने नंतर सविस्तर आदेश देणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.