Jiah Khan केस प्रकरणात आदित्य पांचोलीच्या मुलाचं वाढलं टेन्शन.. तब्बल १० वर्षांनी 'या' तारखेला होणार अंतिम निर्णय

अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरनं सूरज पांचोलीला अटक झाली होती.
Jiah Khan Case Update
Jiah Khan Case UpdateEsakal
Updated on

Jiah Khan: बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या केसविषयीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता जवळपास १० वर्ष होत आली आहेत. या केसवर आता २८ एप्रिलला सीबीआयच्या एका विशेष कोर्टात सुनावणी पार पडेल. सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए एस सैय्यद यांनी गुरुवारी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकले आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे.(Jiah Khan Suicide Case update bollywood actress ex boyfriend sooraj pancholi in tension)

Jiah Khan Case Update
Priyanka Chopra: पहिला सिनेमा ऑफर झाला तेव्हा नाराजच होती प्रियंका.. निर्मात्यासमोर ढसाढसा रडत म्हणाली होती..

माहितीसाठी इथे सांगतो की, २५ वर्षीय जिया खान एक अमेरिकन नागरिक होती..जी ३ जून,२०१३ रोजी जुहू येथील आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत सापडली. त्यानंतर पोलिसांनी सहा पानांच्या एका पत्राच्या आधारावर तिचा कथित बॉयफ्रेंड आभिनेता सूरज पांचोली याला अटक केली होती.

पत्राच्या आधारावर सूरज पांचोलीच्या विरोधात अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला होता. या प्रकरणाला २०२१ मध्ये एका विशेष सीबीआय कोर्टाकडे सुपूर्त करण्यात आलं होतं.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jiah Khan Case Update
Viral Video: 'जर आर्यन खान सोबत पळून गेली नीसा देवगण?', काजोलच्या भन्नाट उत्तरानं शाहरुखची बोलती झालेली बंद..

तक्रारदारी पक्षातील प्रमुख साक्षीदार असलेल्या जिया खानच्या आईनं कोर्टाला सांगितलं की तिच्या म्हणण्यानुसार ही हत्या आहे..आत्नहत्या नाही. याच प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी जिया खानच्या आईची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी रद्द केली होती. आपली साक्ष देताना जिया खानची आई राबिया यांनी सांगितलं होतं की सूरज जियासोबत वाईट वागायचा. त्या म्हणाल्या होत्या, ''पोलिस किंवा सीबीआय कोणीच यासंबंधीत पुरेसे पुरावे गोळा करुन आपल्या मुलीनं आत्महत्याच केलीय हे सिद्ध करु शकलेलं नाही''.

सूरज पांचोलीच्या वतीनं प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. सूरज पांचोलीनं केसं संबंधित आवश्यक सगळ्या गोष्टी सादर केल्या आहेत. आपली बाजू मांडली आहे. माननीय सर्वोच्या न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

''सूरजनं जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं नव्हतं हे लवकरच सिद्ध होईल. आता या प्रकरणावर अंतिम निर्णय २८ एप्रिलला होईल'',अशी माहिती प्रशांत पाटील यांनी दिली. सध्या या प्रकरणात सूरज पांचोली जामीनावर बाहेर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.