Tejaswini Pandit: जिजाऊंच्या जयंतीनिमित्त नव्या सिनेमाची घोषणा, तेजस्विनी पंडित साकरणार आऊसाहेब

जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आगामी मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय
jijau marathi movie announcement starring tejaswini pandit as jijamata released soon
jijau marathi movie announcement starring tejaswini pandit as jijamata released soon SAKAL
Updated on

Jijau Marathi Movie News: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासीक सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार अशा अनेक सिनेमांनी लोकांचं प्रेम मिळवलं. याशिवाय या सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली.

अशातच आणखी एका ऐतिहासीक मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. हा सिनेमा म्हणजे 'स्वराज्य कनिका जिजाऊ'.

जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

jijau marathi movie announcement starring tejaswini pandit as jijamata released soon
Merry Christmas Review: कसा आहे कतरिना - सेतुपतीचा मेरी ख्रिसमस? वाचा रिव्ह्यू

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली.

प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित जिजाऊंची भूमिका साकारणार आहे.

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘’ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य - स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर ठाम राहिल्या.

कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे.

ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !’’

जिजाऊ या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. ६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरपासूनच जिजाऊची उत्सुकता शिगेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.