Poster of new film ‘JNU' : 'काश्मीर फाईल्स', 'आर्टिकल 370' नंतर आता 'जेएनयु'! नव्या पोस्टरनं सोशल मीडियावर वादळ

JNU Movie चा पोस्टर व्हायरल झाला असून त्यावरुन आता मोठा गदारोळ होताना दिसत आहे.
JNU Movie Poter Viral
JNU Movie Poter Viral esakal
Updated on

‘JNU: Jahangir National University Movie Poster : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्सनं देशभरामध्ये कशाप्रकारचे वातावरण निर्माण केले होते हे अनेकांनी पाहिले अन् अनुभवले होते. केंद्र सरकारनं देखील हा चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी जाहीर केली होती. सरकारी कार्यालयांसाठी खास आदेशही काढले होते. या सगळ्यात आता जेएनयु चित्रपटाची घोषणा झाली असून त्याच्या पोस्टरनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

दिग्दर्शक विनय शर्मा दिग्दर्शित जेएनयु (जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी) चित्रपटाची चर्चा आहे. त्यामध्ये उर्वशी रौतेला, सिद्धार्थ बोडके, पियुष मिश्रा, रश्मि देसाई, सोन्हाली सेहगल, रवि किशन आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले आणि वेगळ्याच चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले आहे.

सोशल मीडियावर जेएनयुचे पोस्टर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी संबंधित चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशातील एका प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेला अशा प्रकारे अपमानित करणे चूकीचे आहे. राजकीय विचारधारेनं प्रेरित होऊन हे सगळं केलं जात असल्याचे आऱोप यावेळी नेटकऱ्यांनी केले आहेत.

एक्सवर देखील जेएनयु नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. त्यात काहींनी काश्मिर फाईल्स, आर्टिकल 370 नंतर जेएनयु नावाचा चित्रपट. असे म्हणत वेगवेगळ्या राजकीय स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेएनयु (जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी) असे मुळ नाव असून ते चित्रपटामध्ये जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी असे नामकरण करण्यात आले आहे. हा एक प्रकारचा शब्दच्छल असल्याचे बोलले जात आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शन देखील त्या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. त्यानं म्हटलं आहे की. जेएनयुचे पोस्टर व्हायरल झाले असून तो चित्रपट पाच एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

​ विनय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर अशा प्रकारचे चित्रपट प्रदर्शित होणे यामागील मुख्य कारण काय, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर जेएनयुमध्ये त्याच्या फाशीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली होती. हा मुद्दा मुख्यस्थानी असणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.