RAW Trailer : देशाच्या धाडसी गुप्तचराची 'रॉ' कहानी

John Abraham starrer RAW trailer out
John Abraham starrer RAW trailer out
Updated on

मुंबई : अभिनेता जॉन अब्राहम हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे ओळखला जातो. फायटींग सिन्स असलेले त्याचे चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. आता अशाच एका चित्रपटात जॉन एका गुप्तचराच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रोमियो अकबर वॉलटर' (रॉ) या चित्रपटात जॉन मुख्य भूमिकेत आहे.

'रॉ'चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका भारतीय गुप्तचराच्या संघर्षावर आधारित ही कहानी आहे. जो आपली देशभक्ती, धाडस आणि बलिदान देऊन देशाची सेवा करत असतो. हा चित्रपट भारत-पाक मधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारीत आहे. 

 



1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युध्द 13 दिवस चालले होते. युध्द संपेपर्यंत पाकिस्तानच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय लष्करासमोर गुडघे टेकले होते. या वेळेची परिस्थितीही चित्रपटात दाखवली आहे. 

जॉनने अलिकडेच चित्रपटात त्याचे आठ वेगवेगळे लुक्स असणार आहेत याविषयी सांगितले होते. एका 26 वर्षीय मुलापासून ते 85 वर्षीय वृध्दापर्यंतची भूमिका त्याने चित्रपटात वठवली आहे. जॉन सोबतच अभिनेता जॉकी श्रॉफ आणि अभिनेत्री मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे लिखाण आणि दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे. तर धीरज वर्धन, अजय कपूर, वनेसा वालिया व गॅरी ग्रेवाल यांनी निर्मिती केली आहे. 'रॉ' येत्या 5 एप्रिल ला प्रदर्शित होईल.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()