Oscars 2024: सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची उत्सुकतेने वाट बघत असतात. 10 मार्च रोजी ऑस्कर-2024 (Oscars 2024) हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतात आज सकाळपासून होत आहे. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काही सेलिब्रिटींनी ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्यात जॉन सीनानं (John Cena) देखील हजेरी लावली. यावेळी जॉनला बेस्ट कॉस्ट्युम डिझाइन पुरस्कारांची घोषणा करायची होती. पण तो या पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर चक्क नग्न अवस्थेत आला. नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जॉन हा नग्न अवस्थेत स्टेजवर आलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॉन सीना हा सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइन या कॅटेगिरीच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर नग्न अवस्थेत येतो. त्याच्या हातात एक कार्ड आहे, ज्यावर 'बेस्ट कॉस्ट्युम', असं लिहिलेलं दिसत आहे. यावेळी जॉन म्हणतो,"कॉस्ट्युम खूप महत्वाचे आहेत." त्यानंतर जॉनकडे पाहून सगळे हसायला लागतात.
'पुअर थिंग्स'ला सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइनचा ऑस्कर मिळाला आहे. तसेच बेस्ट मेकअप अँड हेअरस्टाईलचा ऑस्कर पुरस्कार देखील या चित्रपटाला मिळाला आहे. ओपनहायमर या चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर रॉबर्ट डाउनी ज्युनियरला देण्यात आला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार दा'वाइन जॉय रँडोल्फला देण्यात आला.
भारतातील प्रेक्षक ऑस्कर पुरस्कार सोहळा ओटीटीवर पाहू शकतात. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.