Journey Marathi Movie : आयुष्यातला प्रवास खूप काही शिकवून जातो! 'जर्नी'ची गोष्टच भारी

यासगळ्यात आणखी एका मराठी चित्रपटाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. तो चित्रपट म्हणजे जर्नी.
Journey Marathi Movie Poster Viral fans praised
Journey Marathi Movie Poster Viral fans praisedesakal
Updated on

Journey Marathi Movie Poster Viral fans praised : मराठी चित्रपट विश्वामध्ये आणखी एका चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. सध्या मराठी चित्रपटांची मोठी क्रेझ आहे. बाईपण भारी देवा नंतर सुभेदार, आता बापल्योक चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

यासगळ्यात आणखी एका मराठी चित्रपटाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. तो चित्रपट म्हणजे जर्नी. एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा 'जर्नी' चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित 'जर्नी' चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे दिसत आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

Journey Marathi Movie Poster Viral fans praised
Jawan: जवान येण्यापुर्वीच जवान 2 ची तयारी सुरु! अपडेट विचारताच शाहरुख म्हणाला,..

पोस्टरवरून हा एक भावनिक, कौटुंबिक चित्रपट असल्याची चर्चा आहे. सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित या चित्रपटात अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकर गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने यांच्यासह माही बुटाला आणि निखिल राठोड या बालकलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.

Journey Marathi Movie Poster Viral fans praised
Jawan: शाहरुखच्या 'जवान'मुळे गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल, 'या' कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता

पोस्टरमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावरील गंभीर भाव खूप काही सांगून जाणारे आहे. त्यावर त्यांना मिळालेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले हे चढउतार, संघर्ष काय आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याची 'जर्नी' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे म्हणतात, '' एका लहान मुलाच्या असामान्य प्रवासाची ही कथा आहे. त्याचा हा जीवनप्रवास या मुलाला कोणत्या वळणावर नेतो, हे 'जर्नी'मध्ये पाहायला मिळणार आहे. आयुष्यातील प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. 'जर्नी'तील प्रवास हा कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. कुटुंबातील प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. या प्रवासादरम्यान खूप गोष्टी उलगडत जाणार आहेत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.