Junior Mehmood: "मी जग सोडून गेल्यावर..", ज्युनियर मेहमूद यांची शेवटची इच्छा ऐकुन डोळे पाणावतील

ज्युनियर मेहमूद यांचं आज वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद निधन झालं
Junior Mehmood last wish will bring tears to his eyes
Junior Mehmood last wish will bring tears to his eyes SAKAL
Updated on

Junior Mehmood Last Wish: गेल्या काही दिवसांपासुन कॅन्सरशी झुंज देत असणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांचं निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी ज्युनियर मेहमूद यांचं निधन झालं.

ज्युनियर मेहमूद पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. ज्युनियर मेहमूद यांनी त्यांची शेवटची इच्छा सांगितली होती. ती वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

Junior Mehmood last wish will bring tears to his eyes
Junior Mehmood Passed Away : अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ही होती ज्युनियर मेहमूद यांची शेवटची इच्छा

ज्युनियर मेहमूद यांनी शेवटची इच्छा सांगितली होती. ते म्हणाले होते, "मी जग सोडून गेल्यावर लोकांनी मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखावं. तुम्ही जग सोडून गेल्यावर चार लोकं तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणून लक्षात ठेवत असतील तर तुमचं आयुष्य सार्थकी लागलं असं नक्कीच म्हणता येईल."

जितेंद्र - सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा केलेली व्यक्त

नईम सय्यद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. नुकतेच त्यांनी आपले मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले होते, ज्यात ज्युनिअर मेहमूदची अवस्था पाहून जितेंद्रचे डोळे ओले झाले होते. जॉनी लिव्हरनेही त्यांची भेट घेऊन हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Junior Mehmood last wish will bring tears to his eyes
Junior Mehmood: तेरे जैसा यार कहाँ! कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ज्युनियर मेहमूद यांच्या भेटीला जितेंद्र अन् सचिन..

ज्युनियर मेहमूद यांचं वर्कफ्रंट

ज्यूनियर महमूद यांनी त्यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे खरे नाव नईम सैय्यद होतं. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९५६ साली झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये २६५ हून अधिक चित्रपटात काम केलं होतं.त्यांनी तब्बल सात भाषांमधील चित्रपटांत काम केलं होतं, त्यांनी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग, गुरू और चेला, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.