जस्टिन बिबरची अवस्था वाईट.. चेहऱ्याला झाला अर्धांगवायू , डोळाही उघडेना..

आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे.
Justin Bieber says he is suffering from facial paralysis
Justin Bieber says he is suffering from facial paralysissakal
Updated on

Justin Bieber : अवघ्या जगाला वेड लावणारा गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिनचे 'बेबी' हे गीत . सर्वाधिक गाजले. या गाण्यानंतर जगभरात ख्याती पोहोचलेल्या जस्टिनला मोठा नावलौकिक मिळाला. लवकरच जस्टिन भारत दौरा करणार अशी चर्चा होती. पण त्याच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Justin Bieber says he is suffering from facial paralysis due to ramsay hunt syndrome)

जस्टिन बीबर जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगभरात दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जस्टिनने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली.

Justin Bieber says he is suffering from facial paralysis
आणि मांजरेकरांनी चित्रपटाला थेट 'लालू प्रसाद यादव' असं नाव दिलं.. जबर किस्सा

या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आजारा विषयी सांगितले आहे. त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असून तो रामसे हंट सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. जस्टिन म्हणाला, ‘तुम्ही बघू शकता, माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूने मी हसूही शकत नाही. त्या बाजूच्या डोळ्याची हालचालही होत नाहीत. शी रद्द करण्यामागचे हेच कारण आहे. मला माहितीय यामुळे माझे चाहते नाराज झाले आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. तुम्ही मला समजून घ्याल अशी अशा बाळगतो.’

पुढे जस्टिन म्हणाला की, 'यातून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. विश्रांती आणि थेरपीद्वारे मी बरा होत आहे. लवकरच सेटवर परत येण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून मला माझे काम पूर्ण करता येईल ज्यासाठी मी जन्माला आलो आहे.' याच वर्षी मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेलीला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जस्टिनचा दौरा पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. आधी करोनामुळे आणि आता जस्टिनच्या आजारपणामुळे.

Justin Bieber says he is suffering from facial paralysis
आम्ही आई वडिलांचे पाय धुवून पाणी प्यायलो, आशा भोसले झाल्या भावूक

रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) म्हणजे काय?

रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येतात, जे वेदनादायक असतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा, व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो, तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.