Kaali Poster: हिंदू देव-देवतांचा केला अपमान! लीना मणिमेकलाईला समन्स

काली चित्रपटाची निर्माती लीना मणिमेकलाई ही तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.
Kaali documentary news
Kaali documentary news esakal
Updated on

Leena manimekalai : काली चित्रपटाची निर्माती लीना मणिमेकलाई ही तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. तिच्यावर बॉलीवूडमधील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. (social media news) द काश्मीर फाईल्समधील दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी (the kashmir files news) तर मणिमेकलाईला मुर्ख बाई असे म्हटले होते. आता तिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिल्ली कोर्टानं लीनाला समन्स धाडले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिला कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.

कालीच्या पोस्टरनं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यात शंकर आणि पार्वती यांचे (social media viral post) वादग्रस्त चित्र लीनानं पोस्ट केले होते. त्यावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आपल्या चित्रपटाला होणारा वाद लक्षात घेऊन तिनं त्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यात ती म्हणाली होती की, तुम्ही विनाकारण माझ्या कलाकृतीवरुन वाद निर्माण करु नका. पहिल्यांदा मी जे काही तयार केले आहे ते एकदा पहा. म्हणजे मी काय म्हटले आहे आणि मी त्या प्रकारची निर्मिती का केली आहे हे तुम्हाला कळेल. मात्र नेटकऱ्यांनी काहीही ऐकण्यास विरोध दर्शवला होता.

Kaali documentary news
धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

कालीच्या चित्रणासंबंधी तिच्याविरोधात समन्स जाहीर करण्यात आले आहे. आता लीनाला मेलद्वारे देखील समन्स पाठविण्यात आले आहे. त्याप्रकरणावर आता नोव्हेंबर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यापूर्वी जुलैमध्ये देखील लीनाला नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र ती काही कोर्टात हजर झाली नव्हती. त्याचा परिणाम म्हणून आता तिच्याविरोधात समन्स व्हायरल करण्यात आले आहे. लीनासारख्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपण जी कलाकृती तयार करतो आहोत ती तयार करताना हजारवेळा विचार करावा. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Kaali documentary news
Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

कालीमधून तिनं भगवान शंकर आणि पार्वती यांचा अपमान केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच काहींनी तर लीनाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही दिसून आले होते. या केससंदर्भात अधिवक्ता राज गौरव म्हणाले की, चित्रपटाच्या पोस्टरमध्ये देवदेवतांना धुम्रपान करताना दाखवण्यात आले आहे. यावरुन काय समजायचे. यातून हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Kaali documentary news
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.