Kaccha Badam: ‘कच्चा बादाम’फेम गायक भुवनची अवस्था बिकट! फसवणूक करून चोरले गाण्याचे हक्क, आता फिरतोय..

‘कच्चा बादाम’फेम गायक भुवन बड्याकरला आता स्वतःचंच गाणं गाताना अडचण येत असल्याने पोटापाण्याचे हाल झाले आहेत..
kacha badam fame singer bhuban badyakar face copyright issue for his own song cause fraud case
kacha badam fame singer bhuban badyakar face copyright issue for his own song cause fraud casesakal
Updated on

Kaccha Badam : ‘कच्चा बादाम’ हे गाणे माहीत नाही असे कुणीच नाही, काही महिन्यांपूर्वी या गाण्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता. जो-तो या गाण्यावर नाचत होता. हे गाणे होते बंगालच्या भुवन बड्याकर यांचे. आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी गायलेले हे गाणे इतके लोकप्रिय झाले की त्यांची ओळख बनली.

या गाण्यामुळे भुवन रातोरात स्टार झाले. त्यांना प्रसिद्धी, पैसा सर्व काही मिळालं. आता ते यातून बाहेर पडून आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडत आहेत. पण त्यांची मोठी अडचण झाली आहे. ते आता स्वतःचेच गाणे गावू शकत नाही. त्याचे कारणही तसेच आहे, त्यांची मोठी फसवणूक झाली आहे.

(kacha badam fame singer bhuban badyakar face copyright issues for his own song cause fraud)

kacha badam fame singer bhuban badyakar face copyright issue for his own song cause fraud case
Shashank Ketkar: सगळे सण साजरे करण्याच्या पद्धती.. 'हिंदी'च्या अनुकरणावर शशांक केतकर भडकला..

भुबन बड्याकर यांनी त्यांच्याबरोबर फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या गाण्याचे कॉपीराइट कुणी दुसऱ्यानेच घेतले आहेत. त्यामुळे त्यांना ते गाणं गाता येत नाही. सोशल मीडियावर ते गाणं पोस्ट केल्यावर त्यांना कॉपीराइट पाठवला जात आहे. यामुळे गाण्याच्याच जीवावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भुवनपुढे उपजीविकेचाच मोठा पेच निर्माण झाला आहे.

त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलं की, 'गोपाल नावाच्या एका व्यक्तीने त्यांना ३ लाख रुपये देत हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं.

त्यासाठी त्यांना हे पैसे दिले होते. पण आता भुबन जेव्हाही हे गाणं गातात आणि पोस्ट करतात, तेव्हा कॉपीराइट इश्यू येतो. त्याने आमची फसवणूक करून या गाण्याचे कॉपीराइट विकत घेतले.

‘त्या व्यक्तीने पैसे देताना काही कागदपत्रांवर माझ्या सह्याही घेतल्या होत्या. मी अशिक्षित आहे. मला हे सर्व समजत नाही आणि यामुळे माझा गैरफायदा घेतला गेला आहे,' असेही ते म्हणाले.

त्यामुळे भुवन यांनी माध्यमाकडे दाद मागितली आहे. पूर्वी ते जुन्या वस्तु घेऊन त्या बदल्यात बदाम विकायचे. या विक्रिमागे गाणे हेच त्यांचे महत्वाचे साधन होते. आता गाण्यावरच बंदी आणली जात असल्याने भुवन यांना पुढे काय करायचे असा प्रश्न पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.