Kailash Kher birthday : सुफी संगीतातील एक लोकप्रिय नाव म्हणून प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे ओळखले जातात. एवढेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी मोठं नाव कमावलं. त्यांची अनेक गाणी अजरामर आहेत आणि त्यांचा आवाज श्रोत्यांच्या काळजात ठसणारा आहे. पण कैलाश यांना मिळालेलं हे यश काही सहज मिळालेलं नाही, यासाठी कैलाश यांनी मोठा संघर्ष केला आहे. अगदी संगीतातील गुरू शोधण्यासाठी घरही सोडण्यापासून ते आयुष्य संपवण्यापर्यंत ते गेले होते. पण अखेर त्यांना मनासारखे यश मिळाले आणि ते एक लोकप्रिय गायक झाले. अशा कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या आज 49 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची सक्सेस स्टोरी...
(kailash kher birthday : Kailash Kher's Journey From 'being Suicidal' To Becoming The Leading singer)
कैलाश यांचा जन्म झाला 7 जुलै 1973 मध्ये उत्तर प्रदेश येथे झाला. कैलाश यांना बालपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती पण कुटुंबाकडून मात्र बराच विरोध झाला. त्यांनी गाणे शिकावे अशी कुटुंबाची इच्छा नव्हती. यासाठी त्यांना मोठा विरोध पत्करावा लागला. संगीतक्षेत्रात काम करता यावे यासाठी कैलाश यांनी 14 व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी लहान मुलांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली. आणि यशाची एकएक पायरी चढत वर गेले.
गाणं ही आवड असली तरी त्यातून चरतार्थ चालत नव्हता, म्हणून 1999 मध्ये कैलाश यांनी त्यांच्या मित्रासोबत हँडीक्राफ्टचा व्यवसाय सुरु केला. पण ते वर्ष कैलास यांच्यासाठी मोठे हालाखीचे गेले. तेव्हा कैलास आणि त्यांच्या मित्राला या व्यवसायात मोठा फटका बसला. नुकसान झाल्यामुळे कैलाश यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ते डिप्रेशनमध्ये गेले होते. पण त्यातून बाहेर पडत त्यांनी 2001 साली मुंबई गाठली.
कैलाश यांच्या आयुष्यात अनेक संकटं आली पण त्यांनी संगीत सोडले नाही. जेव्हा कैलाश हे संगीत दिग्दर्शक राम संपत यांना भेटले तेव्हा त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. एका अॅडमध्ये जिंगल्सचे गायन करुन कैलाश यांनी करिअरला सुरुवात केली. पुढे अक्षय कुमार आणि प्रियंका चोपडा यांच्या अंदाज या चित्रपटातील 'रब्बा इश्क ना होवे' या कैलाश यांच्या गाण्यानं अनेकांची मनं जिंकली. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केले. कैलाशा यांनी आजवर हिंदी, नेपाळी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि उर्दू या भाषांमध्ये 700 हून अधिक गाणी गायली आहेत. कैलाश यांना फिल्मफेअरच्या बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.