Gabh marathi movie: अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे.
त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी ‘गाभ’ या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. (Kailash Waghmare and sayali bandkar Gabh Movie poster launched)
ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा चित्रपट आहे.
टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना कैलास सांगतो की, ‘गाभ’ मधील भूमिका ही अतिशय वेगळ्या स्वरूपाची असून प्रेक्षकांसाठी तो एक सुखद धक्का असेल, असे सांगितले. आजवर केलेल्या विविध भूमिकांपेक्षा खूपच वेगळी व्यक्तिरेखा यात साकारायला मिळाली, याचे समाधान आहे.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणूस त्याच्या गुण-दोषांसह ‘हिरो’ असू शकतो, हे दर्शवणारी ही भूमिका आहे. अभिनेत्री सायली बांदकर सांगते मी शहरी भागात वाढलेली असल्यामुळे पूर्णपणे अपरिचित अशा ग्रामीण भागाशी जुळलेल्या या कथानकामधील भूमिका खूपच आव्हानात्मक होती, माणसांसोबत काम करणं सोपं असतं पण अनोळखी जनावरांच्या संगतीत काम करणं अवघड असतं. मात्र एकदा जनावराचा विश्वास संपादन केला की ते तुम्हाला आपलंसं करतं. त्या अर्थानं खूप कांही शिकवणारा आणि समृद्ध करणारा अनुभव म्हणजे ‘गाभ’ चित्रपट आहे, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी व्यक्त केली!
‘गाभ’ चित्रपटात कैलास वाघमारे, विकास पाटील, सायली बांदकर, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे.
गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची चंद्रशेखर जनवाडे तर जबाबदारी पार्श्वसंगीताची रविंद्र चांदेकर यांनी सांभाळली आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.
रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गाणू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे. व्हीएफक्स माधव चांदेकर तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी सुंदर कुमार यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर चंद्रशेखर जनवाडे तर प्रोडक्शन मॅनेजर रंगराव पाटील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.