Kajol gets trolled for her remark on politicians education : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलनं तिच्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत आहे. अजूनही काजोल सोशल मीडियावर सक्रिया असणारी अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. काजोल ही इंस्टावर ट्रेडिंग असणारी सेलिब्रेटी आहे.
काजोल ही नेहमीच तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली गेली आहे.तिला एखादी गोष्ट पटली नाही तर ती त्यावर सडेतोडपणे बोलताना दिसली आहे. अशाच एका वक्तव्यामुळे काजोल वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काजोलनं आपल्या देशातील नेते फारसे शिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे व्हिजन नसल्याची खंत काजोलनं व्यक्त केली होती. यावरुन काजोलच्या नावाची चर्चा झाली.
Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या
काजोलवर आता नेटकरी चांगलेच चिडले आहेत. काहींनी काजोलचं वक्तव्य कौतूकास्पद असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा बॉलीवूडमधून कुणी अधिकारवाणीनं बोलण्याचे धाडस दाखवले आहे. त्यामुळेच की काय आता काजोलवर नेटकरी जोरदारपणे टीका करतील. अशी भीती काहींनी व्यक्त केली आहे. काजोल ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. काजोल आणि तिची बहिणी यांच्यातील भांडणं ही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
काहींनी काजोलला तू फार शिकलेली नाही. त्यामुळे कोण किती शिकलं यावरुन तुला बोलण्याचा अधिकार नाही. तू मधूनच शाळा सोडली होती. हे तुला आठवते का, असे काजोलला विचारले आहे. ट्विटरवरुन काजोलला काही जणांनी सुनावले आहे. काजोल ही तिच्या ट्रायल - प्यार, कानून, धोका या मालिकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी तिनं ते विधान करुन लक्ष वेधून घेतले होते.
आता काजोलनं आपण तशा प्रकारचे वक्तव्य केले त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीनं काढला गेला आहे. मला तसे म्हणायचे नव्हते. आपल्याकडचे नेते धोरणी आहेत. त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. आपण आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आपण तसा विचार का करत नाही हेच मला कळत नाही. मी फक्त केवळ शिक्षण आणि त्याचे महत्व याविषयी बोलत होते. मला कुठल्याही राजकीय नेत्याचा अपमान करायचा नव्हता. असे म्हटले आहे.
आपल्याकडे काही महान नेते आहेत. ते आपल्या देशाला महान बनवत आहेत. त्यांचा मार्ग मोठा आहे. याची आपल्याला माहिती आहेच. काजोलनं असं म्हणताच तिला काहींनी पुन्हा तिच्या विधानांची आठवण करुन दिली आहे. माझा हेतू खूप स्वच्छच होता. हे लक्षात घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.