कल्कीचं मुलीसाठी स्पेशल गाणं, मुलीचा हा क्युट व्हिडिओ होतोय व्हायरल

kalki koechlin
kalki koechlin
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन वाढवले आहे. आणि यापुढेही हे लॉकडाऊन वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच घरातच आपापल्या कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहेत. अशातच या लॉकडाऊनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कल्की कोचिन तिची मुलगी साफो आणि प्रियकर गाय हर्षबर्ग सोबत वेळ घालवत आहे. लॉकडाऊनमध्ये ती त्यांच्यासोबतचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. अशातच कल्कीने तिची मुलगी सोफा सोबतचा एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुलीसाठी एक स्पेशल गाणं गाताना दिसून येत आहे.

कल्कीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या मुलीसाठी गिटार घेऊन एक गाणं गात आहे. तिच्या हातात छोट गिटार दिसून येत आहे. आणि साफोच्या बाजूला बसून ती तिच्यासाठी एक बंगाली गाणं गात आहे. 'घूम परानी... माशी पिशी...' हे प्रसिद्ध बंगाली गाणं ती गाताना दिसत आहे. हे गाणं ती सोफासाठी खास शिकली आहे. कल्की आणि सोफाचा हा व्हिडिओ खूप क्यूट आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ghoom parani Thank you @gangulytikka for teaching me to skip along to this Bengali tune #shortandsweet #lullaby

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिने गायिका अवंतिका गांगुली हीचे आभार मानले आहे. या व्हिडिओवर तिने कॅप्शन लिहिले आहे की, ' घूम परानी...' ही बंगाली ट्यून मला शिकवल्याबद्दल अवंतिका तुझे आभार.' कल्की सध्या तिच्या मुलीसोबत बराचसा वेळ घालवता दिसते. याधीही तिने मुलीसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

kalki koechlin sings bengali song for her daughter  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.